Advertisement

मुंबईसह महाराष्ट्रात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रांचा शुभारंभ


मुंबईसह महाराष्ट्रात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रांचा शुभारंभ
SHARES

येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रांचा शुभारंभ होणार असून त्यापैकी ३ पासपोर्ट केंद्र मुंबईत तर २ नवी मुंबई अाणि पनवेल इथं सुरू होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. 


२५१ पासपोर्ट केंद्र उभारणार

देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 'पासपोर्ट आपल्या दारी' या तत्त्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीनं जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात ७ तर देशभरात १७३ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाली असून दुसऱ्या टप्प्याअखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ केंद्रांसह देशभरात २५१ पासपोर्ट सेवा केंद्रांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.


ही अाहेत नवीन पासपोर्ट केंद्र

‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत राज्यात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या दीड महिन्यात ही केंद्र सुरू होणार आहेत. ही केंद्र सिंधुदुर्ग, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड आणि जळगाव इथं सुरू करण्यात येतील.


गेल्या वर्षात राज्यात सात केंद्र

जानेवारी २०१७ पासून सुरू झालेल्या देशव्यापी कार्यक्रमानुसार एप्रिल २०१८ अखेरपर्यंत दोन टप्प्यात एकूण २५१ पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड इथं नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाली आहेत.


हेही वाचा -

ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे मुंबईत विलिनीकरण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा