Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत कोरोनाबधितांची संख्या ५० हजारांवर

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५० हजार ०८५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ८४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus pandemic:  मुंबईत कोरोनाबधितांची संख्या ५० हजारांवर
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १०९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३१४ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोना बाधीत रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६४  रुग्ण दगावले आहेत. तर १ जून रोजी ४० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २ जून रोजी रोजी एकूण ४९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे १३१४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५० हजार ०८५  इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ८४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २२ हजार ०३८  रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई

तर राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा