Advertisement

पार्किंगची सुविधा असलेल्या वाहनतळांपैकी १४ वाहनतळांचा कमी वापर

महापालिकेच्या सार्वजनिक वाहतळांपैकी १४ वाहनतळांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी वापर होत असल्याची माहिती समोर येत आहे.

पार्किंगची सुविधा असलेल्या वाहनतळांपैकी १४ वाहनतळांचा कमी वापर
SHARES

मुंबईतील वाहतुककोंडी कमी करण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेनं सार्वजनिक वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, या सार्वजनिक वाहनतळांपैकी १४ वाहनतळांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी वापर होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या वाहनतळांच्या आजुबाजुच्या परिसरात कारवाई करण्यात येणार आहे. 

सशुल्क पार्किंग सुविधा

मुंबईतील रस्त्यांवर अवैध पार्क केल्या जाणाऱ्या खासगी बसगाड्यांना बेस्ट डेपोंमध्ये सशुल्क पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत शालेय बस संघटनेने केलेल्या विनंतीनुसार शालेय बसकरिता शुल्कामध्ये कपात करण्यात येणार आहे. हे सुधारित दर लवकरच निश्चित केले जाणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. 

अवैध पार्किंगवर कारवाई

कमी वापर होत असलेल्या सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटरच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. दक्षिण मुंबई, विक्रोळी व बोरिवली या भागात रस्त्यांलगत होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर अधिक कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या मनुष्यबळाची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्याचे अधिकार विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.



हेही वाचा -

पुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार

रल्वेप्रमाणं एसटी महामंडळही प्रवाशांना पुरवणार पाण्याची सुविधा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा