Advertisement

रल्वेप्रमाणं एसटी महामंडळही प्रवाशांना पुरवणार पाण्याची सुविधा

रेल्वेप्रामणं 'रेलनीर'च्या धर्तीवर एसटीनं बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

रल्वेप्रमाणं एसटी महामंडळही प्रवाशांना पुरवणार पाण्याची सुविधा
SHARES

राज्यभरात एसटीनं प्रवास करताना प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेप्रामणं 'रेल नीर'च्या धर्तीवर एसटीनं बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहेराज्यातील एसटी स्थानकं आणि आगारांमध्ये बाटलीबंद पाणी विकण्याच्या नावाखाली प्रवाशांची लूट होते. बाटली थंड करण्याच्या नावाखाली एका बाटलीसाठी २२ ते २५ रुपये आकारण्यात येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी एसटी महामंडळानं खासगी कंपनीच्या माध्यमानं बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला

बाटलीबंद पाणी

एसटीच्या सर्व स्थानक आणि आगारांमध्ये २५० मिलीलीटर५०० मिलीलीटर आणि एक लीटर अशा स्वरूपात बाटलीबंद पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेमात्र, ही बाटलीची किंमत किती असणार याबाबत अद्याप महिती मिळालेली नाही. याबाबत निविदा मागवण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेदिवाळीपर्यंत हा उपक्रम कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे. 

बस स्थानकांवर विक्री

एसटीचा लोगो आणि ब्रँड बाटलीबंद पाणी बस स्थानकांवर विक्री करता खासगी पुरवठादार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी शनिवार ७ सप्टेंबर रोजी निविदा मागवण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळाच्या नियोजन आणि पणन विभागाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ' दरम्यान, एसटीच्या बाटलीबंद पाणी विक्री उपक्रमाबाबत एसटी अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची माहिती समोर येतं आहे. एसटी महामंडळाच्या वाणिज्य विभागाकडून 'एसटी जल'साठी पुरवठादार नियुक्तीसाठी खासगी कंपनीकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र महामंडळाच्या नियोजन आणि पणन विभागाला याची माहितीच नसल्याचं समजतं. त्यामुळं पुरवठादार कंपनी खासगी असावी की सरकारी या मुद्द्यांवर महामंडळात २ गट निर्माण झाले आहेत.



हेही वाचा -

पुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार

आचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा