Advertisement

पुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार


पुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार
SHARES

गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतं १० दिवस मुक्कामासाठी आलेल्या गणपती बाप्पाला गुरूवारी 'अनंत चतुर्दशी'ला निरोप दिला जात आहे. या विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्त मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळत आहे. परंतु, बाप्पाला निरोप दिला जात असला तरी पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहेत.

गणपती बाप्पाला निरोप

अवघा महाराष्ट्र आणि गणेशभक्त जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. मात्र पुढल्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासकांनी दिली. पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी शनिवार २२ ऑगस्ट रोजी येणार आहे.

बाप्पाचं आगमन कधी?

पुढच्या वर्षी प्रमाणं २०२१ ते २०२५ वर्षापर्यंत बाप्पाचं आगमन कधी होणार याबाबत माहिती समोर येत आहे.  २०२१ मध्ये शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे. २०२२ मध्ये बुधवार ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे. २०२३ मध्ये मंगळवार १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे. २०२४ मध्ये शनिवार ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे. तसंच, २०२५ मध्ये बुधवार २७ ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी येणार आहे.



हेही वाचा -

गणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज!

लाइव्ह अपडेट्स : गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा