Advertisement

कांदिवली, मिरा रोड, जीटीबी नगर स्थानकाचा होणार कायापालट

पश्चिम रेल्वेच्या कांदिवली, मिरा रोड, हार्बर रेल्वेच्या गुरू तेग बहादूर नगर (जीटीबी) या रेल्वे स्थानकांमध्ये खाण्याचे स्टॉल्स, ओपन एअर रेस्टॉरंट आणि इतर सोईसुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.

कांदिवली, मिरा रोड, जीटीबी नगर स्थानकाचा होणार कायापालट
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वयंचलित जिने, उद्वाहने, वाय-फाय, यांसारख्या आधुनिक सुविधा रेल्वेनं उपलब्ध केल्या आहेत. अशातचं आता मुबईतील १६ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. त्याशिवाय, पश्चिम रेल्वेच्या कांदिवली, मीरारोड आणि हार्बर रेल्वेच्या गुरू तेग बहादूर नगर (जीटीबी) या रेल्वे स्थानकांमध्ये खाण्याचे स्टॉल्स, ओपन एअर रेस्टॉरंट आणि इतर सोईसुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.

१६ रेल्वे स्थानक

मुंबईतील १६ रेल्वे स्थानकांचा कायापालट पुढील ५ वर्षांमध्ये करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट व्हावा यासाठी रेल्वे विकास महामंडळानं आखलेल्या योजनेनुसार, कांदिवली, मिरा रोड आणि गुरू तेग बहादूर नगर स्थानकाच्या विकासाचं काम तातडीनं हाती घेण्यात येणार असून, पुढील ५ वर्षांत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य महामंडळानं ठेवलं आहे.

अनेक सुविधा 

मिरा रोड रेल्वे स्थानकात दुमजली इमारत, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर डेक, ओपन एअर गार्डन संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे. कांदिवली स्थानकात ३ मजली इमारत, ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसाठी पिकअप आणि ड्रॉप पॉइंट्स, खाण्यापिण्यासाठी फूड कोर्ट, बुक शॉप आणि मेडिकल स्टोअर, स्वयंचलित जिने आणि १० मीटर रुंदीचे ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहेत. तसंच, गुरू तेगबहादूर नगर स्थानकात दुमजली इमारतप्लॅटफॉर्म क्रमांक १ वर डेक, ओपन एअर गार्डन संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजुर

EXCLUSIVE : झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी मंगेशनं घेतलं उंदीर मारण्याचं ट्रेनिंग



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा