Advertisement

चर्चगेट ते विरार रेल्वे ट्रॅकमधून काढला १६ हजार किलो कचरा

रेल्वे ट्रॅकवरील कचऱ्यामुळे पाणी साचून रेल्वे वाहतूक कोलमडू नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने चर्चगेट ते विरार दरम्यानच्या ट्रॅकवरील कचरा साफ केला.

चर्चगेट ते विरार रेल्वे ट्रॅकमधून काढला १६ हजार किलो कचरा
SHARES

हवामान खात्याने पुढील २ दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रेल्वे ट्रॅकवरील कचऱ्यामुळे पाणी साचून रेल्वे वाहतूक कोलमडू नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने चर्चगेट ते विरार दरम्यानच्या ट्रॅकवरील कचरा साफ केला. या साफसफाई मोहिमेद्वारे ट्रॅकमधून तब्बल १६ हजार किलो कचरा काढण्यात आला. 

प्रवाशांना प्रचंड त्रास

मुंबईत जोरदार पाऊस झाला की सर्वात पहिल्यांदा उपनगरीय लोकल सेवा कोलमडते. ट्रॅकलगतची गटारं, नाले कचऱ्याने तुडूंब भरलेली असल्याने पावसाचं पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. परिणामी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातात. यामुळे रेल्वे वाहतूक सेवेचं वेळापत्रक बिघडतं. मागील काही दिवसांमध्ये तरी हेच दृष्य दिसून आलं. त्याचा रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

प्लास्टिकचा कचरा

त्यातच हवामान खात्या (IMD)ने १९ ते २१  सप्टेंबर दरम्यान मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने चर्चगेट ते विरारदरम्यान ट्रॅकच्या साफसफाईचं काम हाती घेतलं. या कामादरम्यान १६ हजार किलो कचरा काढण्यात आला. या कचऱ्यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या कचऱ्याचं प्रमाण जास्त होतं. दादर ते वांद्रे दरम्यान २ हजार किलो आणि मुंबई सेंट्रल, नालासोपारा आणि विरारमधून ३ हजार किलो कचरा काढण्यात आला.हेही वाचा-

मुंबई-ठाण्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा

२ ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक होणार हद्दपार...Read this story in हिंदी or English
संबंधित विषय