Advertisement

मानखुर्दमधल्या बाल गृहातील १८ मुलं कोरोना पॉझिटिव्ह

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अधिक आहे.

मानखुर्दमधल्या बाल गृहातील १८ मुलं कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) संख्या पुन्हा वाढत चालली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अधिक आहे. मानखुर्दमधील चिल्ड्रन होममध्ये (Mankhurd Children Home) जवळपास १८ मुलं कोरोना पॉझिटिव्ह (children corona positive ) आढळून आली आहेत.

पालिकेनं म्हटलं आहे की, मानखुर्द स्थित बाल गृहातील एकूण १८ मुलांनी कोविड -19 साठी सकारात्मक चाचणी केली. गेल्या तीन दिवसांमध्ये ही संख्या वाढली आहे. त्यापैकी शुक्रवारी, २७ ऑगस्ट, २०२१ रोजी १५ मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या सर्व मुलांना चेंबूर आणि वाशी नाका येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१ रोजी मुलांपैकी एका मुलाची पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर मुलांमध्ये संसर्ग पसरला. त्यानंतर गुरुवारी, २६ ऑगस्ट, २०२१ रोजी आणखी दोन मुलांची पॉझिटिव्ह चाचणी झाली. त्यानंतर सर्वांच्या चाचण्या केल्या तर जवळपास १८ मुलं पॉझिटिव्ह आली आहेत.

सर्व मुलांना कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. या सर्व मुलांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर या मुलांच्या संपर्कात आलेल्या मुलांची यादी करण्यात आली असून तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पालिकेनं अलीकडेच दोन अहवाल दिले होते. अनाथ आश्रम आणि बोर्डिंग शाळेतील २२ मुलं आणि ठाणे स्थित सरकारी बाल केंद्रातील १४ मुले कोरोनाव्हायरससाठी पॉझिटिव्ह आली होती.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून योग्य खबरदारी घ्या असं वारंवार सूचवलं जात आहे. पण, मुंबई कोरोना हळूहळू हातापाय पसरत असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, राज्यात ४ हजार ६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. तर दुसरीकडे ३ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९७% एवढा आहे. एकूण ५२ हजार ८४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.



हेही वाचा

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांसाठी संस्थापक विलगीकरण बंधनकारक

दोन डोस घेऊनही प्रमाणपत्रात एक डोस घेतल्याचं नमूद


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा