Advertisement

कांदिवलीतील पेट्रोलपंपावर स्फोट, ३ जण जखमी


कांदिवलीतील पेट्रोलपंपावर स्फोट, ३ जण जखमी
SHARES

कांदिवली पश्चिमेकडील पेट्रोल पंपावर आॅटो रिक्षामध्ये 'सीएनजी' भरताना अचानक झालेल्या स्फोटात ३ जण जखमी झाले आहेत. यांत पेट्रोलपंपावरील एक कर्मचारी आणि २ रिक्षा चालकांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. जखमी रिक्षा चालकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे.




कसा घडला स्फोट?

कांदिवली पश्चिमेकडील मिलाप पंपावर ही दुर्दैवी घटना घडली. सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे रिक्षा चालकांनी सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांग लावली होती. त्यानुसार एका रिक्षात गॅस भरण्यात येत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात ३ जण जखमी झाले. ही घटना घडताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. सोबतच जखमींना उचलून तात्काळ नजीकच्या तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


प्रमाणाबाहेर गॅस

या स्फोटामुळे रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला असून पेट्रोल पंपाचंही मोठं नुकसान झालं आहे. या स्फोटामुळे पेट्रोलपंप तातडीने बंद करण्यात आला. रिक्षामध्ये प्रमाणापेक्षा अधिक गॅस भरण्यात आल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.



हेही वाचा-

दादर चौपाटीवर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत एकाची हत्या

लोकलमधील सराईत महिला चोर अटकेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा