Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांची ३० मिनिटे सवलत रद्द ?


पालिका कर्मचाऱ्यांची ३० मिनिटे सवलत रद्द ?
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ३० मिनिटांची सवलत बंद केली जाणार आहे. यापूर्वी असलेली १० मिनिटांची सवलत बंद करून सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ३० मिनिटांची सवलत देण्याबाबतचं परिपत्रक लागू केलं होतं. परंतू या विरोधात कामगार संघटना न्यायालयात गेल्यामुळं अखेर हे परिपत्रक रद्द करून पुन्हा जुन्याच कार्यपध्दतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अचूक वेळेत पोचावं लागणार अाहे. वेळेवर न पोहोचल्यास कर्मचाऱ्याच्या तीन दिवसांच्या लेटमार्कनंतर अर्धा दिवस कापला जाणार आहे.


पगार कापले


मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रीक पध्दतीने नोंदवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची अचूक वेळ नोंदवली जाते. त्यामुळे उशिरा आलेल्या कर्मचाऱ्याने हजेरी न नोंदवल्यास त्यांना विभागप्रमुखांकडून कारणे स्पष्ट होईपर्यंत त्यांचा पगार काढला जात नाही. किंबहुना त्यांचा पगार कापला जातो. त्यामुळे मागील दोन महिन्यांपूर्वी अनेकांचा पगार कापले गेले होते. तसेच काहींचे रोखले गेले होते.

यावर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने दहा मिनिटांची जी सवलत दिली जाते, त्यात अधिक सुधारणा करून अर्धा तासाची सवलत दिली. या ३० मिनिटांमध्ये जेवढी मिनिटे उशिराने कर्मचारी येईल, तेवढी मिनिटे त्या कर्मचाऱ्याने उशिरा थांबून भरुन द्यायला हवी.  या ३० मिनिटांच्या कालावधीनंतर पुढील ३० मिनिटांच्या कालावधीत उशिर झाल्यास प्रत्येक मिनिटाला कर्मचाऱ्याचा पगार कापला जाणार आहे. त्यामुळे जुन्या परिपत्रकानुसार १० मिनिटांच्या सवलतीच्या काळात ३ लेटमार्कनंतर जो अर्धा दिवस कापला जायचा तो या नवीन परिपत्रकानुसार होत नव्हता. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी याचे स्वागत केलं. तर काही कर्मचाऱ्यांनी जुनीच पध्दत अवलंबली जावी अशी मागणी केली होती.


न्यायालयात दावा 

याबाबत कामगार संघटनेच्या प्रतिनिधीने न्यायालयात दावा केला होता. त्यावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका प्रशासन ३० मिनिटांचं नवीन परिपत्रक रद्द करत असल्याचं समजतं. महापालिका प्रशासनाच्यावतीनं आता न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर करून जे ३० मिनिटांचे नवीन परिपत्रक प्रशासनाने जारी केलं आहे, ते मागे घेत असून जुन्या परिपत्रकानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिकेचं जुनं परिपत्रकानुसार १० मिनिटांची जी सवलत दिली जाते ती फक्त कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी आहे. परंतु नवीन परिपत्रकानुसार जी ३०मिनिटांची सवलत दिली होती, सर्व खात्यांमधील १ लाख २ हजार कर्मचाऱ्यांसाठी लागू केली होती. त्यामुळे नवीन परिपत्रक रद्द झाल्यास सफाई कामगारांसह, अभियंते, नर्स, वॉर्डबॉय आदींना याचा लाभ मिळणार नाही.




हेही वाचा - 

उपायुक्त विजय बालमवार यांची पुन्हा बदली

याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा