Advertisement

राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती, 3000 कॉन्स्टेबलची होणार नियुक्ती

मुंबई पोलिसात कंत्राटी नोकरी! पहिल्यांदाच होणार 3000 लोकांची भरती, जाणून घ्या मोठे कारण

राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती, 3000 कॉन्स्टेबलची होणार नियुक्ती
(File Image)
SHARES

महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद (MSSC) कडे 11 महिन्यांसाठी 3,000 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याच्या मागणीच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र गृह विभागाने मंगळवारी मंजुरी दिली. यापूर्वी मुंबई पोलिसांनी काही दिवस किंवा आठवडे एमएसएससी किंवा होमगार्डची सेवा घेतली होती.

जवळपास वर्षभरात पहिल्यांदाच मुंबई पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा मागावा लागला आहे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की कोविड महामारी आणि यापूर्वी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

मुंबई पोलीस दलातून दरवर्षी सुमारे 1,500 कर्मचारी निवृत्त होतात. वर्षाला तेवढ्याच संख्येने पोलिसांची भरती केली जाते. 2019, 2020 आणि 2021 या वर्षात पोलीस विभागातून पोलीस कर्मचारी निवृत्त होत राहिले, मात्र त्या काळात कोविडमुळे पोलीस भरती झाली नाही.

कोविड दरम्यान सुमारे 500 पोलिसांचा मृत्यू झाला. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आजारपण आणि इतर कारणांमुळे व्हीआरएसही घेतले. म्हणजेच गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार ते पाच हजार पोलिसांची कमतरता होती आणि त्या रिक्त जागा अजिबात भरल्या गेल्या नाहीत.

गेल्या वर्षी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ज्यांच्याकडे गृहखाते आहे) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 17,000 पोलिसांच्या भरतीला मान्यता दिली. त्यापैकी 8,000 मुंबईसाठी आहेत. या वर्षी मुंबई पोलिसांची निवड प्रक्रिया जवळपास संपली असली तरी, निवड झालेल्या लोकांना नऊ महिन्यांचे आवश्यक प्रशिक्षणही मिळणार आहे.

तसेच त्यांना अधिकृतपणे मुंबई पोलिसांत रुजू होण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेकडून (MSSC) 3,000 कर्मचाऱ्यांना 11 महिन्यांसाठी करारावर नियुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती.



हेही वाचा

दहिसर ते मीरा-भाईंदर प्रवास बसने 10 मिनिटात करता येणार

मुंबईत लागू झालेली 10 टक्के पाणीकपात पालिका रद्द करणार?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा