Advertisement

मुंबईत कर न भरल्याने ३१ विकासकांच्या साईट्स 'सील'!

४५ कोटींच्या थकबाकीसाठी ११ मोठ्या मालमत्तांवरील कारवाईमुळे 'सील' करण्यात आलेल्या मोठ्या मालमत्तांची संख्या ३१ झाल्याची माहिती करनिर्धारण आणि संकलन विभागाचे सहायक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी दिली.

मुंबईत कर न भरल्याने ३१ विकासकांच्या साईट्स 'सील'!
SHARES

मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम वसूल न झाल्याने तब्बल ३१ इमारतींच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.


११ नव्या मालमत्तांना ठोकलं 'सील'!

महानगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या आणि वारंवार मागणी करुनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनानुसार करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे सर्वस्तरीय कारवाई सुरु आहे. या महिन्यात यापूर्वी ४७ कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी २० मोठ्या मालमत्तांवर 'सील' कारवाई करण्यात आली होती. तर आता ४५ कोटींच्या थकबाकीसाठी ११ मोठ्या मालमत्तांवरील कारवाईमुळे 'सील' करण्यात आलेल्या मोठ्या मालमत्तांची संख्या ३१ झाल्याची माहिती करनिर्धारण आणि संकलन विभागाचे सहायक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी दिली.

या थकबाकीदारांमध्ये सर्वाधिक म्हणजे रुपये १५ कोटी ७९ लाख १० हजार ८९६ एवढी थकबाकी ही महापालिकेच्या 'एस' विभागातील (भांडुप पश्चिम) दत्त मंदीर मार्गावरील मे. एचडीआयएल यांच्या भूखंडावरील आहे. या थकित मालमत्ता कराच्या वसूलीकरता भूखंडावरील मालमत्तेचे 'सेल्स ऑफीस' आणि २ प्रशासकीय कार्यालये 'सील' करण्यात आली आहेत.


'या' मालमत्ता झाल्या सील

'एस' विभागातील मे. एचडीआयएल यांचा भूखंड

'एफ उत्तर' विभागातील मे. ग्रेस ग्रुप ऑफ कंपनीजचे भूखंड

'जी दक्षिण' विभागातील रिअल जेम बिल्डटेक प्रा. लि. (डी. बी. रिअॅलिटी) यांचे
भूखंड

कमला मिल कम्पाऊंडमधील 'ट्रेड विंग'चे भूखंड

ना. म. जोशी मार्गावरील श्रीपती इन्व्हेस्टमेंट

रुपाजी कन्स्ट्रक्शन यांचे भूखंड

'जी उत्तर' विभागातील दीजय डेव्हलपर्स व आकृती डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्सचा
भूखंड

'एन' विभागातील व्हायटल डेव्हलपर्सचा भूखंड

'टी' विभागातील मूलदीप को-ऑप हौसिंग सोसायटीमधील भूखंड



हेही वाचा

मालमत्ता कर न भरल्याने ७ विकासकांच्या साईट्स सील


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा