Advertisement

मुंबईतील ३८३ सार्वजनिक शौचालये धोकादायक!

मुंबईत १४१५ सार्वजनिक शौचालये असून त्यातील ९३४ शौचालयांचं ऑडीट करण्यात आलं आहे. यामधील ३८३ शौचालयेही धोकादायक स्थितीत अाहेत.

मुंबईतील ३८३ सार्वजनिक शौचालये धोकादायक!
SHARES

मुंबईतील अनेक शौचालये ही जुनी झालेली असून या शौचालयांच्या टाक्यांची सफाई न झाल्यामुळे टाक्या फुटून  दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जात आहे. या स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल विभाग कार्यालयांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत २४ पैकी २० विभाग कार्यालयांच्या हद्दीत ऑडीट केलेल्या शौचालयांमध्ये तब्बल ९३४ शौचालये धोकादायक असल्याचं आढळून आली आहेत.


स्ट्रक्चरल ऑडीटचे आदेश 

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडीट तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जानेवारी महिन्यात सर्व संबंधीत सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयांचं ऑडीट करण्यात येत असून आतापर्यंत बी, सी, ई आणि जी-दक्षिण वगळता सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सावजनिक शौचालयांचं ऑडीट करण्यात आलेलं आहे.


९३४ शौचालयांचं ऑडीट

संपूर्ण मुंबईत १४१५ सार्वजनिक शौचालये असून त्यातील आतापर्यंत ९३४ शौचालयांचं ऑडीट करण्यात आलं आहे. तर त्यातील ३५५ शौचालयांचं ऑडीट होणं बाकी आहे. परंतु ऑडीट करण्यात आलेल्या ९३४ शौचालयांपैकी ३८३ शौचालयेही धोकादायक स्थितीत असल्याची आढळून आली. ही सर्व ३८२ शौचालये सी वन प्रवर्गात मोडत असल्यामुळे ती तोडून पुन्हा त्यांचं बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यासर्व शौचालयांची बांधणी लॉट ११ मध्ये केली जाणार आहे. तर १८ सार्वजनिक शौचालयांची मोठ्या स्वरुपात दुरुस्ती केली जाणार आहे आणि १०२ शौचालयांची किरकोळ स्वरुपात दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे. यासर्व कामांना ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


४ विभागांत शौचालय नाही

महापालिकेच्या बी आणि सी विभागांमध्ये एकही सार्वजनिक शौचालयांची बांधणी करण्यात आलेली नाही. तर जी-दक्षिण विभागात ६० सार्वजनिक शौचालये असली तरी ती म्हाडाच्या माध्यमातून बांधली गेलेली आहे. ती महापालिकेच्यावतीनं बांधली नसल्यानं त्यांचं ऑडीट करण्यात आलेलं नाही. यासंदर्भात उपायुक्त (घनकचरा) विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असतात्यांनी सांगितलं की, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व सार्वजनिक शौचालयांचं ऑडीट करण्यात येत आहे. हे ऑडीट सध्या सुरु असून सर्व विभागांमधून ऑडीट येणं बाकी आहे. परंतु यामध्ये काही शौचालये धोकादायक असल्याची आढळून आलेली आहे. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील धोकादायक सार्वजनिक शौचालयांच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात केली जाईल.  


शौचालयांच्या दुर्घटना

५ मार्च २०१५ - मानखुर्द महाराष्ट्रनगर साईबाबा चाळ,१ बळी
४ फेब्रुवारी २०१७ - मानखुर्द मंडालातील इंदिरा नगर लोहार चाळ, ३ बळी
२८ एप्रिल २०१८ - भांडुप टँक रोड, २ बळी


विभाग-धोकादायक शौचालये 

एम पश्चिम- १५८
एन विभाग- ७०
एस विभाग- ४९
डी विभाग- २६



हेही वाचा -

गिरगावमधील कोळणींचं कोयता आंदोलन, मेट्रो-३ विरोधात आक्रमक

शिकाऊ डाॅक्टरांच्या पालघरमधील प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह?




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा