Advertisement

महापालिकेच्यावतीनं ५० शिक्षकांना महापौर पुरस्कार


महापालिकेच्यावतीनं ५० शिक्षकांना महापौर पुरस्कार
SHARES

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या महापौर पुरस्काराची घोषणा मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केली. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारानं ५० शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.


१९७१ पासून पुरस्कार

मुंबई महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडवण्याचे काम करत असून त्यांचा यथोचित गौरव १९७१ पासून करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला केवळ २ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. परंतु आताही ही संख्या ५० वर पोहोचली आहे.


१०८ शिक्षकांच्या मुलाखती

एकूण १०८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून अंतिम ५० गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे १४ शिक्षक, हिंदी माध्यमाचे ६, ऊर्दु माध्यमाचे ३, गुजराती इंग्रजी माध्यमाचे ५,  गुजराती, चित्रकला, हस्तकला, संगीत, विशेष मुलांची शाळा, आदींच्या प्रत्येकी एका शिक्षकाची तर तामिळ, कन्नड या दोन माध्यमांतून प्रत्येकी २ शिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय खासगी अनुदानित शाळांचे ८ आणि खासगी विना अनुदानित शाळांच्या ३ शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे.


५ सप्टेंबर रोजी वितरण

 येत्या ५ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार देऊन शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. दहा हजार रुपये आणि महापालिकेचं मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उपमहापौर हेमांगी वरळीकर,शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्षय यशवंत जाधव,  उपायुक्त मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्यासह शिक्षण समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.


पुरस्कार मिळालेले शिक्षक

भारती रमेश यमगर ( मुख्याध्यापक, मिठानगर मनपा उ.प्रा मराठी), सुवर्णा सुधीर कालेकर (प्रशिक्षिका, जनाबाई आणि माधवराव रोकडे मनपा मराठी शाळा), मंदा विश्वास वंडेकर(प्रशिक्षिका,नवाब टँक उ.प्रा.मराठी शाळा), प्रशांत मनोहर निजाई (प्रशिक्षक, लॉर्ड हॅरिस उ.प्रा.मराठी शाळा), आसावरी राजन नलावडे (प्रशिक्षिका, माहिम कॉजवे मनपा लो.प्रा.मराठी शाळा), ऋतुजा रमेश मोरे(प्रशिक्षिका,भरुचा रोड मनपा मराठी शाळा), 

दर्शना भूषण पाटील (प्रशिक्षिका, चारकोप गांव मनपा मराठी उ.प्रा.शाळा मनपा), राजकुमार बापू थोरात (प्रशिक्षक, एम्.एच.बी म.न.पा मराठी शाळा), अमृता चंद्रकांत जोशी (प्रशिक्षिका, हनुमान नगर मनपा मराठी शाळा), जयश्री सुभाष गवळी(प्रशिक्षिका,नारीयलवाडी मनपा मराठी उ प्रा शाळा), उमिता राहुल गांधले (प्रशिक्षिका, ओशिवरा मनपा मराठी शाळा), वृषाली सुरेश खाड्ये (प्रशिक्षका, पासपोली म.न.पा मराठी शाळा), निवेदिता नितीन मानकामे (प्रशिक्षिका,मुलुंड कँप म.न.पा मराठी शाळा), विदया गणेश आंबोकर (प्रशिक्षका,टागोरनगर म.न.पा उ.प्रा मराठी शाळा),


 ऊर्दू माध्यम

शाह साजिद अमीर शाह(मुख्याध्यापक, शिवाजीनगर म.न.पा उर्दू शाळा), यास्मिन कौसर मोहम्मद ईसा (मुख्याध्यापक, मेघराज सेठी मार्ग मनपा उर्दू शाळा), तौफिक अमीन मुल्ला प्रशिक्षक, काजुपाडा म.न.पा लो.प्रा. उर्दू शाळा), 


हिंदी माध्यम

गौतम रामकुमार पाल (मुख्याध्यापक,वरळीनाका उ.प्रा. हिंदी शाळा), लीलावती इंद्रबहादूर सिंह(मुख्याध्यापक, न्यु सायन मनपा उ.प्रा .हिंदी), जितेंद्रकुमार श्रीनाथ तिवारी (प्रशिक्षक, आकुर्ली रोड मनपा उ. प्रा. हिंदी शाळा), भारती संजीव श्रीवास्तव (प्रशि.शि.,उन्नत नगर मनपा उ.प्रा. हिंदी शाळा), वंदना योगेश चौबे(प्रशिक्षिका, शताब्दी सोहळा, सहकार नगर म.न.पा हिंदी शाळा), शिवकुमार सूर्यपाल  शर्मा  (प्रशिक्षक, गोवंडी म.न.पा.उ.प्रा.हिंदी शाळा),

इंग्रजी माध्यम

सचिन श्याम सिंह(मुख्याध्यापक, चिंचोली इंग्रजी एम.पी.एस शाळा), स्वाती चंद्रशेखर शिदोरे (प्रशिक्षिका, अंधेरी प. मनपा इंग्रजी शाळा), किर्तीदा मनिष त्रिवेदी (प्रशिक्षिका, एक्सर तळेपाखाडी इंग्रजी शाळा), निती चंद्रमौली कैला (प्रशिक्षिका, वरळी सी फेस मनपा उ.प्रा.इंग्रजी शाळा), विनायक जैतु खरे (प्रशिक्षक, पवई म.न.पा इंग्रजी उ.प्रा शाळा),


माध्यमिक खासगी शाळा

 विश्वनाथ बळीराम म्हात्रे(सहा. शिक्षक-एल.के.वाघजी मनपा माध्य खा. शाळा), प्राची प्रदीप जोशी(सहा. शिक्षिका-शीव मनपा माध्यखा. शाळा),  लार्जी  वर्गीस (मुख्याध्यापक -सेंट मॅथ्युज प्रायमरी स्कुल), सतीश रामचंद्र धुरत (सहा. शिक्षक, उदयाचल प्राथ. शाळा पिरोजशा नगर, विक्रोळी), करुणा कृष्ण गज्जाला (शिक्षिका-आय.ई.एस. न्यू इंग्लिश इंग्रजी प्राथमिक शाळा),  परमेश्वरी वैकुंठ्म वीरबत्तीनी(मुख्याध्यापक- मॉर्डन प्रायमरी स्कूल कुर्ला (प)),  

मनदीप कौर विर्दी.(मुख्याध्यापक- दशमेश पब्लिक स्कुल  मुलुंड (प), गुरिंदर कौर जगजीत लांबा (मुख्या.सेठ आर.जे.जे. प्राथ. इंग्रजी शाळा डी.एन.डी. रोड सीएसटी),  शेखर सोपन धुमाळ (मुख्या-विद्या विकास सभा प्राथमिक विद्यालय  बोरीवली (प)), स्वारुप अनाजी सावंत (सहाय्यक शिक्षिका- साधना विद्यालय मराठी), शोभना उदय हेगडे (सहाय्यक शिक्षिका- IES पाटकर गुरूजी विद्यालय, हिंदु कॉलनी दादर),शशिकला माधव  खंदारे (सहा. शिक्षिका- कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय प्रतिक्षानगर ,सायन), प्रितीजा  प्रकाश दळवी.(सहाय्यक शिक्षिका-आय.इ.एस.हर्णे गुरूजी विद्यालय, वांद्रे (पूर्व)


इतर माध्यमे

डॉ. जागृती असित तेरैया (प्रशिक्षिका, हसनाबाद गुजराती म्युनि. शाळा), पोरचेल्वी करुणानिधी(मुख्याध्यापक, आरे कॉलनी उ.प्रा.मनपा तमिळ शाळा, कट्टीमनी श्रीमंत शिवराय  (प्रशिक्षक,जरीमरी म.न.पा उ.प्रा. कन्नड शाळा),  राजेश रामचंद्र अवघडे (शा.शि. प्रशि., क.दा.गायकवाड मराठी शाळा क्र १), दर्शना अनिल राऊत(शा.शि- पोयसर म न प हिंदी शाळा क्र.2), रिटाबेन अशोकभाई पटेल(प्रशिक्षिका-लायन्स जुहू सेंटर मनपा विशेष मुलांची शाळा), मीरा सत्तू बोडके(चित्रकला शिक्षिका-कुलाबा इंग्रजी मनपा उ.प्रा. शाळा मनपा), संदीप विठ्ठल जाधव (कार्यानुभव-टागोरनगर म.न.पा उर्दू  शाळा),  छाया भानूदास साखरे (संगीत शिक्षिका- समतानगर मनपा मराठी शाळा)



हेही वाचा - 

बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय कागदोपत्रीच

नीट परीक्षा वर्षातून एकदाच; केंद्र सरकारचा यु-टर्न





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा