Advertisement

नागपाड्यातील ५०० झाडे दत्तक देऊन राखली जाणार निगा


नागपाड्यातील ५०० झाडे दत्तक देऊन राखली जाणार निगा
SHARES

मुंबईतील झाडांची पडझड सुरु असून अनेक झाडांच्या देखरेखीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुंबईतील झाडांची काळजी घेण्यासाठी सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी पुढाकार घेतला आहे. नागपाडा, मदनपुरा आदी भागातील 500 झाडे दत्तक देण्याचा मानस आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 22 झाडे ही विविध संस्था, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था तसेच एनजीओंनी दत्तक घेतली आहेत. 


तरीही झाडे पडून दुर्घटना

मुंबईतील अनेक झाडांची विकास कामांच्या नावाखाली कत्तल केली जात आहे. अनेकदा या झाडांच्या फांद्या छाटून त्यांचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले, तरी प्रत्यक्षात या सर्व झाडांची देखरेख महापालिकेला करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक झाडे कोसळून अथवा त्यांच्या फांद्या तुटून पडून दुर्घटना घडत आहेत.


सामाजिक संस्था, एनजीओंचा पुढाकार

मुंबईत नव्याने झाडे लावण्याबरोबरच आहे त्या झाडांची योग्यप्रकारे काळजी घेऊन त्यांची देखभाल करता यावी म्हणून 'नागपाडा, मदनपुरा आदी भागातील झाडे विविध संस्थांनी दत्तक घ्यावीत,' असे आवाहन सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी केले आहे. त्यानुसार आतापर्यंत 22 व्यक्ती, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था आदींनी झाडे दत्तक घेतली आहेत. या सर्वांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आल्याचे रईस शेख यांनी सांगितले. या भागातील सुमारे 500 झाडे दत्तक देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.


झाडांचे बुधे आकर्षक

झाडे दत्तक घेतल्यानंतर या सर्व झाडांची निगा राखण्याचे काम हे संबंधित संस्थेचे असेल. प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवतीचा भाग हरित केला जाणार असून त्यावर कलाकृती करून झाडाचा बुंधा आकर्षक कसा दिसेल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा

एक झाड तोडल्यास तीन नव्हे, दोनच झाडे लावणे बंधनकारक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा