Advertisement

मुंबईतील ५२५ तर ठाण्यात ७२ धोकादायक इमारती


मुंबईतील ५२५ तर ठाण्यात  ७२ धोकादायक इमारती
SHARES

मुंबईत धोकादायक अाणि मोडकळीस अालेल्या ५२५ इमारती अाहेत. तर ठाण्यात अशा इमारतींची संख्या ७२ अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी विधानसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरातून ही माहिती समोर अाली अाहे. भाजपाचे अामदार राज पुरोहीत यांनी प्रश्नोत्तर काळात हा मुद्दा उठवून मुंबई महापालिकेकडून धोकादायक अाणि मोडकळीस अालेल्या इमारतींची माहिती मागवली होती. 


१६३ इमारती तोडल्या

एप्रिल महिन्यात मुंबई महापालिकेने एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात ६८८ इमारती धोकादायक म्हणजे सी-१ श्रेणीत असल्याचं अाढळलं होतं. पालिकेने यातील १६३ इमारती तोडल्या. तर शिल्लक राहिलेल्या ५२५ इमारतींपैकी १४७ इमारतींचं पाणी अाणि वीज तोडली होती. १३३ इमारती  पाडण्याचे काम सुरू अाहे. तर १४७ इमारती पालिकेला रिकाम्या करण्यात यश अालं अाहे. 


दुरुस्ती अावश्यक

ठाणे शहरात ९५ धोकादायक इमारतींमधील २३ इमारती तोडण्यात अाल्या अाहेत. ठाण्यातील १४४ इमारतींची दुरुस्ती करणे अावश्यक अाहे. या इमारती रिकाम्या केल्यानंतर हे काम केलं जाणार अाहे. सध्या ठाण्यात ७२ इमारती धोकादायक अाणि मोडकळीस अालेल्या अवस्थेत अाहेत. 



हेही वाचा - 

इमारतींवर स्टंटबाजी करणाऱ्या ६ परदेशी नागरिकांची मायदेशात रवानगी

सीएम चषक कार्यक्रमात डान्स करताना मुलीचा मृत्यू




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा