लोकलपाठोपाठ आता मेट्रो स्थानकांवरही 'बॉटल्स क्रशर्स मशीन'!

Mumbai
लोकलपाठोपाठ आता मेट्रो स्थानकांवरही 'बॉटल्स क्रशर्स मशीन'!
लोकलपाठोपाठ आता मेट्रो स्थानकांवरही 'बॉटल्स क्रशर्स मशीन'!
See all
मुंबई  -  

रेल्वे प्लॅटफॉर्म, रुळांवर पडलेल्या बाटल्यांचा खच प्रवाशांसाठी नवीन नाही. कारण हा कचरा तयार करण्यात प्रवाशांचाच मोठा हातभार असतो. स्थानक परिसरातील हा प्लास्टीकचा कचरा दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठ्या थाटामाटात मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर 'बॉटल्स क्रशर्स मशिन' बसवल्या खऱ्या. पण या मशीनकडे प्रवाशांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे या मशिन स्थानकांवर धूळ खात पडून आहेत.

त्यातच मेट्रोचा परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने 12 स्थानकांपैकी सर्वाधिक वर्दळ असलेल्या 6 मेट्रो स्थानकांवर 'बॉटल्स क्रशर्स मशिन' लावल्या आहेत. सोमवारपासून या मशिन प्रवाशांच्या सेवेत सुरू झाल्या असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


या स्थानकांवर मशिन्स

डी.एन. नगर, अंधेरी, चकाला, मरोळ, साकीनाका, घाटकोपरप्लास्टीकच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या मशीनद्वारे तयार झालेला बाटल्यांचा चुरा फायबर उत्पादक कंपन्यांना पुनर्वापरासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती 'एमएमओपीएल'ने दिली आहे. या मशीन्स 'वाईल्ड वेस्ट मीडिया' या कंपनीने तयार केल्या आहेत.


दिवसभरात 5 हजार बाॅटल्स क्रश

दिवसभरात 5 हजार बाॅटल्स क्रश करण्याची एका मशिनची क्षमता आहे. त्यानुसार 6 मशिनद्वारे दिवसाला 30 हजार बाॅटल्स क्रश करता येतील.


मिळवा डिस्काऊंट कुपन्स

मेट्रो प्रवासी या योजनेद्वारे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यास मदत करणार असल्याने 'वाईल्ड वेस्ट मीडिया कंपनी'सोबत टायअप असलेल्या विविध ब्रँण्डचे डिस्काऊंट कुपन्स अशा प्रवाशांना देण्यात येणार आहेत. साधारणत: 20 ते 25 टक्क्यांचे हे डिस्काऊंट कुपन्स असतील. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा 'एमएमओपीएल'ला विश्वास आहे.
हे देखील वाचा -

आता मेट्रो स्थानकांवरही 'स्वस्त उपचार'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.