आता मेट्रो स्थानकांवरही 'स्वस्त उपचार'!

Mumbai
आता मेट्रो स्थानकांवरही 'स्वस्त उपचार'!
आता मेट्रो स्थानकांवरही 'स्वस्त उपचार'!
See all
मुंबई  -  

मेट्रोने प्रवास करत असताना अचानक तुमची तब्येत बिघडली, तर घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तातडीने स्थानकावरच उपचार मिळतील, तेही अगदी स्वस्तात! मुंबईतील रेल्वे स्थानकांप्रमाणेच आता मेट्रो स्थानकांवरही 'वन रुपी क्लिनिक' उपचार किंवा उपचारांबाबतचा तात्काळ सल्ला देण्यासाठी उपलब्ध होणार आहे.


15 ऑगस्टपासून सेवा

मुंबईतील लोकल प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत उपचार मिळावेत, या हेतूने 'वन रुपी क्लिनिक' ही सेवा सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ आता ही सेवा मेट्रो स्थानकांवरही सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, साकीनाका, मरोळनाका आणि डी. एन. नगर या मेट्रो स्थानकांवर ही सुविधा दिली जाणार आहे. 15 ऑगस्टपासून ही सेवा मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होईल.सर्व प्रक्रिया पूर्ण

मेट्रो व्यवस्थापनाने 'वन रुपी क्लिनिक' चालवणाऱ्या 'मॅजिक दिल' या संस्थेकडे हा प्रस्ताव मांडला हाेता. या प्रस्तावाला संस्थेने त्वरीत होकार दर्शवला. गेल्या महिनाभरापासून क्लिनिकच्या आराखड्यासंदर्भात अनेक बैठका झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला ही सेवा मेट्रो स्थानकांवर सुरू करणार असल्याचे वन रुपी क्लिनिक रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.


मेट्रोतून दिवसाला 5 लाख प्रवासी प्रवास करतात. पण, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णावर उपचार करण्यासाठी मेट्रोकडे डॉक्टर वा क्लिनिकची व्यवस्था उपलब्ध नाही. कुणाला फीट आली, कुणाच्या छातीत अचानक दुखायला लागले, तर त्या रुग्णाला त्वरीत उपचार मिळणे कठीण होते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सेवा देण्याच्या उद्देशाने मेट्रो स्थानकांवर 'वन रुपी क्लिनिक' सुरू करण्यात येत आहे. 15 ऑगस्टला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात येईल.


डॉ. राहुल घुले, संस्थापक, वन रुपी क्लिनिक
हेही वाचा

'वन रुपी क्लिनिक'मध्ये मलेरिया, डेंग्यूची चाचणी 500 रुपयांत


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.