Advertisement

जेपी रोडवरील ६५ अनधिकृत दुकानांवर बुलडोझर


जेपी रोडवरील ६५ अनधिकृत दुकानांवर बुलडोझर
SHARES

अंधेरी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडून वर्सोव्याकडे जाणाऱ्या जयप्रकाश मार्गावरील पदपथांवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी महापालिकेच्यावतीने हातोडा चालवण्यात आला. येथील तब्बल ६५ व्यावसायिक अनधिकृत दुकाने व स्टॅाल तोडण्यात अाले. 



पदपथांवर दुकाने

महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागांतर्गत वर्सोव्याकडे जाणाऱ्या जयप्रकाश मार्गावरील पदपथांवर असलेल्या अनधिकृत दुकानांमुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत होता. तर या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालताही येत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींनुसार मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली. यामध्ये ६५ दुकानांवर कारवाई केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
 

पोलिसांची मदत 

परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मुंबई पोलीस दलाचे २० कर्मचारी, १ जेसीबी, ३ लॉरी व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली होती. तसेच या कारवाईत महापालिकेचे २५ कामगार, कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते, असंही प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा - 


 गोराईत अग्निशमन केंद्रासाठी एस्सेल वर्ल्डकडून जागा

रेल्वे डब्यात जाणीवपूर्वक टाकली विष्ठा, प्रवाशी घाण वासाने बेजार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा