Advertisement

पालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी

दादर व धारावी परिसरामध्‍ये अवघ्‍या १२ तासात तब्‍बल ३३२ मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे या ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

पालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी
SHARES

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे काही नाव घेत नाही. मुसळधार पावसामुळे (Heavy rainfa)  मुंबईतल्या अनेक सखल भागातील रस्ते पाण्याखाली () गेले आहेत. मात्र अशा परिस्थितीत ही पालिकेचे कर्मचारी न थकता काम करत होते. भर पावसात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १२ तासात पंपाच्या सहाय्याने सखल भागातील तुळशी तलावाइतके पाणी उपसल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी कौतुक करत,  जगभरातल्‍या शहरांना ज्‍याप्रमाणे लहरी हवामानाचा फटका बसतो, तशीच स्थिती मुंबई महानगरात दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात उद्भवत आहे. यामुळे मुंबईतील पूर व्‍यवस्‍थापनासाठी अध‍िक प्रभावी उपाय योजनांची चाचपणी प्रशासनाने करावी, असे निर्देशही दिले आहेत.

हेही वाचाः-मुसळधार पावसात लिफ्टमध्ये अडकून दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

मुंबईच्या मुसळधार पावसात पालिकेच्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा बु धवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत केला. सखल भागातील पाण्‍याचा जलद निचरा करण्‍यासह विविध आवश्‍यक उपाययोजना करण्‍याचेही निर्देश  आदीत्य ठाकरे यांनी दिले. तसेच १२ तास न थकता काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुकही केले. दादर व धारावी परिसरामध्‍ये अवघ्‍या १२ तासात तब्‍बल ३३२ मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे या ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अशा परिस्थीत पालिका कर्मचाऱ्यांनी पंपाच्या सहाय्याने १२ तासात मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलावाइतके पाणी बाहेर काढले. यावेळी सुमारे साडे सहा ते पावणे सात हजार दशलक्ष लीटर इतक्‍या पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला आहे.          

हेही वाचाः- एनडीआरएफच्या ५ तुकड्या तैनात- विजय वडेट्टीवार

मुंबईत पूर व्‍यवस्‍थापनासाठी ब्रिमस्‍टोवॅड प्रकल्‍पाची कामे करुन यंत्रणेची क्षमता वाढवली असली. तरी पावसाळ्यात पाणी साचण्‍याची समस्‍या ही दरवर्षी उद्भवतेच आहे. वारंवार अतिवृष्‍टी हा लहरी हवामानाचा तसेच वातावरण बदलाचा परिणाम आहे. चक्रीवादळ, पूर यासह इतरही हवामानाशी संबंधित समस्‍यांचा सामना फक्‍त मुंबईलाच नव्‍हे तर जगातील अनेक शहरांना करावा लागतो आहे. त्‍यामुळे ज्‍या-ज्‍या महानगरांना अशाप्रकारच्‍या समस्‍यांचा सामना करावा लागतो, त्‍यांनी केलेल्‍या पूरक उपाययोजनांची माहिती घेऊन त्‍यातून योग्‍य ते सक्षम पर्याय मुंबईसाठी निवडता येतील. यामध्‍ये वॉटर होल्‍ड‍िंग टँक (भूमिगत पाण्‍याच्‍या टाक्‍या) यासारखे पर्याय विचाराधीन आहेत. त्‍यादिशेने प्रकल्‍प राबविण्‍यासाठी मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल तसेच सर्व पदाध‍िकारी व प्रशासन मिळून एकदिलाने यावर काम करतील. राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्‍य शासनाचे त्‍याला पूर्ण पाठबळ राहील, असे आदीत्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा