मुसळधार पावसात लिफ्टमध्ये अडकून दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने ते लिफ्ट मध्ये चढले लिफ्टचे दरवाजे बंद झाले परंतु लिफ्ट चालू झाली नाही व दरवाजे उघडले नाही त्यामुळे त्यांनी लिफ्टच्या अलार्म वाजवला त्यावरून रहिवाश्यांनी बेसमेंट मध्ये जाऊन लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला

मुसळधार पावसात लिफ्टमध्ये अडकून दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू
SHARES

मुंबईत मंगळवार रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मुंबईची तुंबई (Mumbai was flooded) करून टाकली. पावसात मुंबईच्या विविध भागात अनेक दुर्घटना घडत आहेत. आग्रीपाडा येथे अशाच एका दुर्घटनेत दोन सुरक्षा रक्षकांचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.  जमीर अहमद सोहनन (३२), शेहजाद मोहम्मद सिद्दीकी मेमन (३७) अशी या दोन सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस (Agripada police) अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबईत पावसानं मोडला २६ वर्षातला विक्रम

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी काही वेळेसाठी विश्रांती घेतल्यानंतर पून्हा सुरूवात केली. त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाले. दरम्यान सकाळी ८ च्या सुमारास मुसळधार पावसात नाथानी रेसिडेन्सी, काळा पाणी जंक्शन जवळ, आग्रीपाडा मुंबई येथे दोन सिक्युरिटी गार्ड जमीर आणि  शेहजाद बिल्डिंगचे बेसमेंट मध्ये पाणी चालू करण्यासाठी गेले होते. बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने ते लिफ्ट  मध्ये चढले  लिफ्टचे दरवाजे बंद झाले (Lift Accident) परंतु लिफ्ट चालू झाली नाही व दरवाजे उघडले नाही त्यामुळे त्यांनी लिफ्टच्या अलार्म  वाजवला त्यावरून रहिवाश्यांनी बेसमेंट मध्ये जाऊन लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला परंतु लिफ्ट उघडली नाही. मुसळधार पावसामुळे पाणी पूर्ण बेसमेंटमध्ये भरले व लिफ्ट मध्ये भरले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रहिवाशांनी अग्निशमन दलाला बोलावले अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन लिफ्टची वरील बाजू कापून काढून दोन्ही सिक्युरिटीना बाहेर काढले परंतु ते मयत झाले होते.

हेही वाचाः- निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील इतर कलाकार...

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी  घटनेचा पंचनामा करत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या दुर्घटनेची आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा