Advertisement

स्थायी समितीत 90 मिनिटांत 97 प्रस्ताव मंजूर


स्थायी समितीत 90 मिनिटांत 97 प्रस्ताव मंजूर
SHARES

मुंबई - आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालिका प्रशासनाने कोट्यवधीचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. बुधवारी स्थायी समितीत दीड हजार कोटीचे 97 प्रस्ताव अवघ्या 90 मिनिटात मंजूर करून घेतले. तसेच नव्याने आलेले 27 प्रस्तावही मंजूर करण्यासाठी केवळ 10 मिनिटात मंजूर करण्यात आले. यावेळी छोट्या- छोट्या प्रस्तावावर वाद घालणाऱ्या विरोधकांनीही मवाळ भूमिका घेतली. निवडणुकीपूर्व महापालिकेने कोट्यवधीचे प्रस्ताव केवळ 20 ते 25 मिनिटांत मंजुर करण्याचा धडाका लावला आहे. यातील अनेक कामांची सत्ताधाऱ्यांनी भूमिपूजने पार पा़डली आहेत. उर्वरित सर्व प्रस्ताव मंजुर करून घेण्यासाठी समितीत 90 हून अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी आणले आहेत. एकाच वेळी प्रस्ताव मंजुर केल्यास सत्ताधाऱ्यांवर टीका होईल, अशी भिती असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पत्रकार परिषदे घेवून एकाच वेळी प्रस्ताव आणण्याचे खापर प्रशासनावर फोडले. तरीही बुधवारच्या बैठकीत 90 प्रस्ताव मंजुरीसाठी समितीच्या पटलावर ठेवले. या वेळी प्रशासनाला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, विरोधकांनीही तोंडावर बोट घेतल्याने सत्ताधाऱ्यांनी सुमारे दीड हजार कोटीचे तब्बल 97 प्रस्ताव 90 मिनिटांत मंजूर करून घेतले. यातील 27 प्रस्ताव अवघ्या 10 मिनिटांत चर्चेविना मंजूर करून घेण्यात प्रशासनाला यश आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा