...असाही एक सनदी अधिकारी

 Pali Hill
...असाही एक सनदी अधिकारी
...असाही एक सनदी अधिकारी
See all

मुंबई - सनदी अधिका-यांना सामाजिक भान नसतं, या तुमच्या आमच्याकडून केल्या जाणा-या सरसकट विधानाला छेद देण्याचं काम एका सनदी अधिका-यानं केलंय. पीएमआरडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी 2 लाख 11 हजार 111 एवढ्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. 20 डिसेंबरला झगडे यांची कन्या डॉ. प्रियांका हिचा विवाह कोणताही डामडौल न करता मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अतिशय साधेपणानं झाला. साधेपणानं लग्न करत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी झगडे यांनी ही रक्कम उभारली.

नापिकीनं त्रस्त होऊन मृत्यूला कवटाळणा-या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतक-यांच्या कुटुंबियांसाठी ही रक्कम वापरली जावी, अशी झगडे यांची इच्छा आहे. “आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या जाणीवेतून मुख्यमंत्री निधीसाठी रक्कम दिली,” अशी माहिती महेश झगडे यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली. यासाठी महेश झगडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून कौतुकही केलं.

Loading Comments