Advertisement

भिवंडीत केक कारखान्याची इमारत कोसळली, ३ कामगार...

फॅक्ट्रीमध्ये मुंबई आणि उपनगरीय परिसरासाठी केक आणि बेकरी प्रोडक्ट्स बनवले जात होते.

भिवंडीत केक कारखान्याची इमारत कोसळली, ३ कामगार...
SHARES

भिवंडी तालुक्याच्या श्रीराम कंपाउंडमध्ये मोंजिंनिस केक फॅक्ट्रीची दोन मजली इमारत शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त झाली. या फॅक्ट्रीमध्ये मुंबई आणि उपनगरीय परिसरासाठी केक आणि बेकरी प्रोडक्ट्स बनवले जात होते. या इमारत वाईट अवस्थेत होती.

प्रत्यक्षदर्शींनुसार, सर्वात पहिला वरचा मजला पडला आणि त्याच्या वजनानं थोड्याच वेळात खालचा मजलाही कोसळला. ज्यावेळी ही दुर्घटना झाली तेव्हा फॅक्ट्रीमध्ये केवळ तीन लोक होते. तिघांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. भिवंडी फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. भिवंडी पोलिसांची तुकडीही घटनास्थळी पोहोचली आहे.

फॅक्ट्रीमधील ३ कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी आणि भिवंडी अग्निशमन दलाचे १ फायर वाहन उपस्थित होते. केळकर (४३), शमीम हुसेन (२५), रवींद्र जाधव (५०) अशी जखमी कामगारांची नावं आहेत. सध्या या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फॅक्ट्रीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यामध्ये दोन टनचे १२ केक ओव्हन लावण्यात आलेले होते. या सर्वांचे नुकसान झाले आहे. तसंच या अपघातात अनेक कोटींचं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.हेही वाचा

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय