Advertisement

खार इथं ५ मजली इमारत कोसळून मुलीचा मृत्यू

मुंबईतील खार इथं ५ मजली इमारत कोसळली आहे. मंगळवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळली

खार इथं ५ मजली इमारत कोसळून मुलीचा मृत्यू
SHARES

मुंबईतील खार इथं मंगळवारी दुपारी ५ मजली इमारत कोसळून एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. माही मोटवानी असं या मुलीचं नाव आहे.  मंगळवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळली असून, खार रोड क्रमांक १७ वर ही इमारत आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या.

मधला भाग कोसळला

खार येथील पूजा अपार्टमेंट नावाच्या इमारतीचा मधला भाग अचानक कोसळला.  या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली अडकलं असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तळमजल्यासह ६ मजले असलेली ही इमारत खार जिमखान्याजवळ आहे.


बचावकार्य सुरू

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य सुरू केलं. कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं. हेही वाचा -

Video: PMC बँकेत धास्तावलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी

भारत-पाकिस्तानची फाळणी सोपी, पण युतीचं जागावाटप भयंकर - संजय राऊतRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा