SHARE

सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा यासह अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रालयासमोर मंगळवारी दुपारी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने मंत्रालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.


कर्मचाऱ्यांच्या मागण्या


  • अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी
  • सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
  • केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने द्यावा
  • खाजगीकरण रद्द करा,नियमित भरती करा


दरवेळी संघटनेने आंदोलन पुकारल्यावर मुख्यमंत्री चर्चेला बोलवतात आणि आश्वासनं देतात. मात्र, आश्वासनांची पूर्तता कधीच होत नाही. यामुळं राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या शासनानं तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा असहकार पुकारण्यात येईल. - अविनाश दौंड, सरचिटणीस, बृन्हमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनाहेही वाचा -

महिन्याभरात नवा वृक्ष अधिकारी नेमा! ठाणे महापालिकेला न्यायालयाचा दणका

१२ इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन 

संबंधित विषय
ताज्या बातम्या