Advertisement

पावसाळ्यात समुद्र किनारी जाताय? मग हे वाचाच!


पावसाळ्यात समुद्र किनारी जाताय? मग हे वाचाच!
SHARES

पावसाळ्यात अनेकांना समुद्र किनारी जाऊन भिजण्याचा मोह असतो. समुद्रांच्या लाटांची मजा घेण्यासाठी जर तुम्ही समुद्र किनारी गेला असाल तर, समुद्राच्या भरतीचा आणि हायटाईडचा अंदाज जरुर घ्या. जर अंदाज घेतला नाहीत आणि बेभानपणे राहिलात तर ते जीवावर बेतू शकते.

कारण अशाच प्रकारे समुद्रातील भरतीच्या वेळी मरिन ड्राइव्हवर बसलेल्या तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. 17 वर्षीय प्रिती श्रीकृष्ण पिसेला समुद्रात बुडून जीव गमवावा लागला.



समुद्रात खेचली गेली प्रिती

प्रिती कॉलेजमधील मित्र मैत्रिणींसोबत मरिन ड्राईव्हवर फिरायला आली होती. दुपारी भरतीची वेळ असताना ती कट्ट्यावर बसली होती. त्यावेळी भरतीची मोठी लाट आली आणि त्यामुळे ती समुद्राकडे खेचली गेली.

हा प्रकार मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या लक्षात येताच तातडीने तिला वाचवण्याचे प्रयत्न झाले. मात्र तिला वाचवण्यात यश आले नाही. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर प्रितीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.



हे देखील वाचा - 

मुंबईकरांनो सावधान! हा पावसाळा मोठ्या भरतीचा!

पावसाळा आला, आजारांपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा