आता आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन आधार कार्डवर होणार!

  Mumbai
  आता आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन आधार कार्डवर होणार!
  मुंबई  -  

  राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमधील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन ‘आधार’शी जोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार, जवळपास 59 हजार 289 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन ‘आधार’ संलग्न बायोमेट्रिक प्रणालीशी जोडले जाणार आहे. ही प्रणाली येत्या 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  पडताळणी वेगात सुरू

  केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ धोरणानुसार ‘आधार’ संलग्न बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची (Aadhar Enabled Bio-Metric Attendance System) अंमलबजावणी करण्याचे शासनाने ठरवले आहे. राज्यातील 59 हजार 289 अधिकारी आणि कर्मचारी यांनी 'AEBAS'साठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया देखील वेगाने सुरू आहे.


  यंत्रे लावण्याचे काम सुरू

  सध्या विविध आरोग्य संस्थांमध्ये बायोमेट्रिक यंत्रे देखील लावण्यात येत आहेत. त्याचा आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे ही सुविधा वापरायला गती मिळणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.


  उपस्थिती, वेतनाची सांगड

  बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली वेतनाशी जोडली गेल्यामुळे उपस्थिती आणि वेतन यांची सांगड घालायला मदत होईल. तसेच बायोमेट्रिक यंत्रांची खरेदी, दुरुस्ती आणि देखभाल सर्व कर्मचाऱ्यांकडून त्याचा वापर होतो की नाही, याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

  शिवाय, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी आणि वेळेत उपलब्ध असणे, त्यांना जबाबदारी आणि कार्यक्षमतेची जाणीव करुन देणे, ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सेवा गरजू घटकांपर्यंत पोहोचणे आणि शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा लोकाभिमुख होणे याचा प्रत्यक्ष अनुभव जनतेला मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
  हे देखील वाचा -

  आपत्कालीन परिस्थितीत धावणार बाईक अॅम्ब्युलन्स


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.