Advertisement

माहीम बीचवर नवा ‘सी फेस’, ओपन जीम-सायकल ट्रॅकही बनणार

मुंबईतील माहीम बीच इथं नवीन सी फेस तयार केला जात असून याठिकाणी पर्यटकांच्या सोईसाठी ओपन जीम, सायकल ट्रॅक, वाॅच टाॅवर अशा सुविधा देखील उभारण्यात येणार आहे.

माहीम बीचवर नवा ‘सी फेस’, ओपन जीम-सायकल ट्रॅकही बनणार
SHARES

मुंबईतील माहीम बीच इथं नवीन सी फेस तयार केला जात असून याठिकाणी पर्यटकांच्या सोईसाठी ओपन जीम, सायकल ट्रॅक, वाॅच टाॅवर अशा सुविधा देखील उभारण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम बीच येथील बीच रिनोवेशन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या कामासंबंधी अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.

माहीम (mahim) बीच इथं नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण २ हजार ४६० चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इथं वृक्षारोपणाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या मोहीमेतून इथं जवळपास १ हजार मोठे वृक्ष व २ हजार २०० छोटी झुडपे लावण्यात आली आहेत. ज्यामुळे पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओपन जीम देखील बनवली जाणार आहे. तसंच वॉच टॉवर सारखी अनोखी कल्पना इथं साकार होणार आहे.

हेही वाचा- मुंबईत प्रत्येक वाॅर्डमध्ये होणार तीन लसीकरण केंद्र

 

यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या ५ किलोमीटरच्या प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकबद्दल देखील चर्चा केली. या ट्रॅक संदर्भातील व्यवहार्य शक्यतांबद्दल अभ्यास सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

त्यानंतर आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील धुळीला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसंच येणाऱ्या १० वर्षांचा विचार करून भव्यदिव्य अशा मैदानाचा वापर करून रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या मार्गाने पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासण्यात यावी. मैदानाच्या बाजूला १०० वर्ष जुन्या प्याऊची डागडुजी करून तो पुन्हा वापरात आणण्यासंदर्भात योग्य पावले उचलली जावीत, अशा सूचनाही आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

आदित्य ठाकरे यांनी दादर येथील टिळक ब्रीज व वीर कोतवाल उद्यान यांची देखील पाहणी केली. टिळक ब्रीज इथं होणाऱ्या ट्रॅफिकचे व्यवस्थापन करून ट्रॅफिक तत्काळ कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी करताना चर्चा केली. मुंबई महापालिका यासंदर्भातील दीर्घकालीन योजनेवर काम करत आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी वीर कोतवाल उद्यानातील सुंदर अशा वॉकिंग ट्रॅक संदर्भात चर्चा केली. 

हेही वाचा- महापालिकेचं 'इतक्या' कोटींचं पाणी बिल मध्य-पश्चिम रेल्वेनं थकवलं

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा