Advertisement

मालाडमधील ‘या’ विकासकामांना मिळणार गती?

मालाड पूर्व, दिंडोशी विभानसभा क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे प्राधान्यक्रमाने सुरु करण्याचे निर्देश मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत

मालाडमधील ‘या’ विकासकामांना मिळणार गती?
SHARES

एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांच्या माध्यमातून आणि समन्वयातून मालाड पूर्व, दिंडोशी विभानसभा क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे प्राधान्यक्रमाने सुरु करण्याचे निर्देश मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या विकासकामांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीला आमदार  सुनिल प्रभु, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकाणी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.  के. एच. गोविंदराज, वन विभागाचे प्रधान सचिव  मिलिंद म्हैसकर यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (aaditya thackeray orders to bmc and mmrda to complete development works in malad and dindoshi speedily)

पुढील विकासकामे

मालाड पूर्व कुरार गाव, हुमेरा पार्क येथील राणी सती मार्ग, मल्लिका हॉटेल ते दिंडोशी बस डेपो यांना जोडणारा रस्ता आणि या रस्त्याच्या पुढील टप्प्यात असणाऱ्या पात्र घरांचं स्थलांतर करुन प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करणं, मालाड पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून मालाड रेल्वेस्थानक ते आप्पा पाडा यांना सलग जोडणाऱ्या पुष्पा पार्क पादचारी भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचं रखडलेलं काम जलद गतीने पूर्ण करणं, गोरेगाव पूर्व येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड विकासकामासाठी मुंबई महापालिकेने निधी मंजूर केला असून हा उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाचं काम सुरु करणं, कांदिवली लोखंडवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करणं, यासाठी विन विभागाची नाहरकत मिळवणं, या रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भागात भुयारी मार्गाचे नियोजन करणं, इतर भागातील पात्र घरांचे स्थलांतर करणं, कुरार नाला पात्राचे रुंदीकरण करणं, येथील घरांचे ३/११ सारखी योजना राबवून स्थलांतर करणं, संस्कार कॉलेज येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसीत करणं, येथील बाधित घरांचे पुनर्वसन करणं, पोईसर नदीच्या पात्रातील तसेच कुरार नाल्याच्या पात्रातील रुंदीकरणाच्या हद्दीत येणाऱ्या घरांना त्याच भागात घरे उपलब्ध करुन देणं आदी विविध प्रलंबित विकास कामांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.

यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या भागातील सर्व प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, तसंच प्रत्येक विकासकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळ निर्धारित करुन नियोजीत वेळेत कामं पूर्ण करण्यात यावीत. या विकास कामांच्या प्रगतीबाबत माहिती द्यावी. काही दिवसानंतर पुन्हा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

संबंधीत एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामे जलद गतीने मार्गी लावल्यास बाधितांचे पुनर्वसन होणं, विविध रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे ही कामे संबंधित विभागांनी जलद गतीने मार्गी लावावीत, असं यावेळी आमदार  सुनिल प्रभू यांनी सांगितलं.


हेही वाचा -

वाहन चालकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवे नियम; जाणून घ्या नियम

Unlock 5: कर्मचाऱ्यांनी उडत कामाला जायचं का? वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा सवाल


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा