Advertisement

हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांचं काम कुठपर्यंत?

हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड इथं बांधण्यात येत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या कामाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली.

हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांचं काम कुठपर्यंत?
SHARES

हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड इथं बांधण्यात येत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या कामाची पाहणी पर्यावरण आणि पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केली. 

यावेळी नगरसेविका उर्मिला पांचाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.

दरवर्षीचा त्रास

हिंदमाता परिसर सखल भागात असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचतं. प्रामुख्याने मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचतं व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत परिसरात भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. 

हेही वाचा- यंदा पावसाळ्यात हिंदमाता, गांधी मार्केटमध्ये पाणी साचणार नाही, महापालिकेने केली ‘ही’ तयारी

टाक्यांचं काम काय?

या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी ३ तास पावसाचं अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील. जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच हाय टाईडच्या कालावधीमध्ये याचा विशेष उपयोग होईल आणि त्यामुळे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. सखल भागात पावसाचं पाणी भरू लागलं तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे परिसरात पाणी साचणार नाही. मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी साचतं अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

या भूमिगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपिंग करुन त्या आच्छादित केल्या जातील. मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचतं किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होतं, अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा आणखी संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.

पाणी उपसायची तयारी

मुंबईमध्ये २०२० मध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ६४ टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला होता. मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व कामांतर्गत मुंबईत पावसाचं पाणी साठण्याची संभाव्य अशी ४०६ ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे आधीच सुरु केली आहेत. मुंबईतील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा ४७० पंप भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत. 

(aaditya thackeray took a review hindmata underground tank work by bmc)

 
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा