Advertisement

यंदा पावसाळ्यात हिंदमाता, गांधी मार्केटमध्ये पाणी साचणार नाही, महापालिकेने केली ‘ही’ तयारी

दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबईतील हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये हमखास पाणी साचतं. परंतु यावर्षी या भागांमध्ये पाणी साचू नये म्हणून मुंबई महापालिकेने विशेष उपाययोजना केली आहे.

यंदा पावसाळ्यात हिंदमाता, गांधी मार्केटमध्ये पाणी साचणार नाही, महापालिकेने केली ‘ही’ तयारी
SHARES

दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबईतील हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये हमखास पाणी साचतं. परंतु यावर्षी या भागांमध्ये पाणी साचू नये म्हणून मुंबई महापालिकेने विशेष उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेची माहिती मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आली.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून शुक्रवारी घेतला. 

यावेळी मुंबई महानगरपालिका (bmc) आयुक्त इकबाल चहल यांनी मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये २०२० मध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ६४ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पावसाळापूर्व नालेसफाई व गाळ काढण्याच्या कामांची सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्येच करण्यात आली. परिणामी प्रशासकीय कार्यवाही व निविदा आदी प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामे लवकर सुरु झाली.

मुंबईत पावसाचं पाणी साठण्याची संभाव्य अशी ४०६ ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा देणं, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणं, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आदी कामांना सुरूवात करण्यात आल्याचंही इकबाल चहल यांनी सांगितलं.

हेही वाचा- बाळासाहेबांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल विझली, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मान्सूनपूर्व कामांची सविस्तर माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सादरीकरणातून दिली. यात मागील वर्षी मुंबईत नदी-नाल्यांमधून एकूण ५ लाख ०४ हजार १२५ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला होता. यंदा त्यामध्ये सुमारे ३५ टक्के वाढ करुन ६ लाख ८५ हजार ३५८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या उद्दिष्टापैकी आजमितीपर्यंत १ लाख ८३ हजार ७१६ मेट्रिक टन म्हणजे सुमारे ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. 

दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये हमखास पाणी साचतं. तेथील पाण्याचा निचरा आता पूर्वीपेक्षा वेगाने होतो. असं असले तरी या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरुपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरु लागलं तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, असं वेलरासू यांनी नमूद केलं.

त्याचप्रमाणे मुंबईतील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा ४७० पंप भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. रेल्वेसह इतर यंत्रणांनीही आपापल्या हद्दीत आतापर्यंत चांगल्या रितीने नालेसफाई व स्वच्छतेची कामे केल्याचं दिसून येत आहे, असं वेलरासू यांनी सांगितलं.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा