Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

राज्यातील गोरगरीब, मजुरांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार, छगन भुजबळ यांचं टीकाकारांना उत्तर

ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली.

राज्यातील गोरगरीब, मजुरांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार, छगन भुजबळ यांचं टीकाकारांना उत्तर
SHARES

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी व्यक्त केलं आहे. 

शिवभोजन थाळीबद्दल माहिती देतानाच या योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचारदेखील छगन भुजबळ यांनी घेतला. गेले अनेक दिवस समाज माध्यमांद्वारे शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे. मात्र गरीबांचं पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पाहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावं, असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं.

गुरूवारी पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचं वितरण करण्यात आलं तर शुक्रवारी दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचं मोफत वितरण करण्यात आलं आहे.

हेही वाचा- “मुंबईचे डबेवाले, सलून, टॅक्सी चालकांनाही पॅकेज द्या”

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागाने गुरूवारी मोफत शिवभोजन थाळीचं वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या (coronavirus) काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीदेखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या आहेत.

संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे. अशा  गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत असल्याची भावनादेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

(maharashtra food and civil supply minister chhagan bhujbal reply bjp on shiv bhojan thali )


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा