Advertisement

बाळासाहेबांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल विझली, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत असताना विझली असून त्याचा धूर होताना दिसत आहे.

बाळासाहेबांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल विझली, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत असताना विझली असून त्याचा धूर होताना दिसत आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर तोफ डागली. 

पालघर येथील साधू हत्याकांडाला वर्ष पूर्ण होत असताना प्रविण दरेकर आणि भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य भोसले यांनी मंत्रालयाजवळ राज्य सरकार विरोधात लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, पालघर साधू हत्याकांडाला १ वर्ष पूर्ण झालं, तरी अजून न्याय मिळाला नाही. हिंदुत्वाचे तेजस्वी रूप हिंदुहृदयसम्राट दि. बाळासाहेब ठाकरेंनी झळाळतं ठेवलं होतं, त्यांनी हिंदुत्वासाठी 'मशाल' पेटवली होती. मात्र त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे सत्तेवर असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरेंनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं व सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा- पालघर साधू हत्याकांडातील ८९ आरोपींना जामीन मंजूर

सोबतच पालघर साधू हत्याकांडात राज्य सरकारने चार्जशीट दाखल केली, त्यातील जबाब वेगळे, रेकाॅर्ड वेगळं, आजही हत्याकांडात सामील असलेले आरोपी बाहेर आहेत. जे प्रथमदर्शीनी फोटो आणि शुटिंगमध्ये देखील दिसत आहेत. सरकार पोलिसांमार्फत हे प्रकरण दडपत आहे. न्यायालयात ताकदीने लढत नाही. त्यामुळे त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी झाली, तरच साधूंना न्याय मिळू शकेल, अशी आमची मागणी आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, गेल्या वर्षी लाॅकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. या हत्याकांडाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झालं आहे. 

(bjp leader pravin darekar demands separate inquiry in palghar mob lynching case)

हेही वाचा- १५०० रुपयांत रिक्षाचालक कुटुंबाचं पोट भरणार कसं? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा