Advertisement

छ. शिवाजी पार्मधील भूमिगत विहिरींचं काम प्रगतीपथावर

छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं ३५ भूमिगत विहिरी तयार करण्याचं आणि पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात फारसं पाणी साचणार नाही. तसंच मैदानाच्या देखभालीसाठी लागणारी पाण्याची गरज भागेल.

छ. शिवाजी पार्मधील भूमिगत विहिरींचं काम प्रगतीपथावर
SHARES

मुंबईतील दादर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पर्जन्य जलसंकलनाचं काम (रेनवॉटर हार्वेस्टिंग) महापालिकेकडून (bmc) सुरू आहे. या कामाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी पाहणी केली. नगरसेविका विशाखा राऊत यांच्यासह महापालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.

इथं ३५ भूमिगत विहिरी तयार करण्याचं आणि पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात फारसं पाणी साचणार नाही. तसंच मैदानाच्या देखभालीसाठी लागणारी पाण्याची गरज भागेल. धूळ कमी होऊन मैदान परिसर हिरवागार राखण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. 

सोबतच चैत्यभूमीजवळ पावसाळी पाण्यासाठी असलेल्या आऊटफॉल पॉईंटच्या जागेला अर्बन स्पेसमध्ये रुपांतरित करण्याचं काम सुरू आहे. या कामाचीही मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. दरवर्षी लाखो नागरिक या स्थळाला भेट देतात. त्यांना सुंदर जागा उपलब्ध व्हावी असा प्रयत्न आहे, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- पश्चिम रेल्वेनं 'या' ठिकाणी २ हजार ५०० अत्याधुनिक कॅमेरे लावले

आर्थिक मदत

तौंते चक्रीवादळादरम्यान झाड पडून दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्या वरळी बीडीडी चाळ येथील संगीता खरात यांच्या वारसांना राज्य शासनातर्फे ४ लाख रुपयांची आर्थिक मदत आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या हस्ते देण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी मृताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदत सुपूर्द केली.

नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या प्रयत्नातून वॉर्ड क्र. १९७ मध्ये नूतनीकरण केलेल्या जिजामाता नगर दवाखाना आणि आरोग्य केंद्राचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर,  माजी राज्यमंत्री सचिन अहीर, नगरसेवक आशिष चेंबुरकर, माजी आमदार सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नाने वरळी कोळीवाडा इथं गरजूंसाठी शिवभोजन केंद्र सुरू झालं. या केंद्राचं देखील उद्घाटन करण्यात आलं.

(aaditya thackeray took a review underground well construction work at shivaji park dadar mumbai)

हेही वाचा- हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांचं काम कुठपर्यंत?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा