Advertisement

वांद्र्यात रिमझिम पावसात पाच गाड्या एकमेकांना धडकल्या


SHARES

मुंबईत झालेल्या रिमझिम पावसामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाच गाड्या एकमेकांना धडकल्या. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास भरधाव वेगात येणारी इंडिका गाडी बोरिवलीहून वांद्र्याच्या दिशेला जात होती. याच दरम्यान इंडिका कार घसरली आणि थेट पुलावरील बॅरिकेटला जाऊन ध़डकली. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने गाडीला ब्रेक लावला. तेव्हा गाडी तर थांबली, पण अचानक ब्रेक लागल्याने इतर चालक मात्र दचकले. त्यामुळे आणखी चार गाड्यांची एकमेकांना धडक बसली. यामध्ये सर्वात पुढे इंडिका गाडी होती. त्यापाठी रिक्षा, तर त्याच्यापाठी असलेल्या टवेरा आणि सर्वात शेवटी असलेल्या टेम्पोची एकमेकांना धडक बसली.

मिळालेल्या माहितीनुसार बोरिवलीहून वांद्रेच्या दिशेने जाताना प्रचंड वाहतूक कोंडी होते. ती वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिस रोज सकाळी रस्त्यावर बॅरिकेट लावतात. संध्याकाळी ते बॅरिकेट पुन्हा रस्त्याच्या कडेला ठेवले जाते. पण बुधवारी रात्री ते बॅरिकेट रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या आढळून आल्या. बुधावारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे इंडिका कार घसरली आणि ती थेट त्या बॅरिकेटला जाऊन आदळली. त्या बॅरिकेटला वाचवण्यासाठी चालकाने गाडीला ब्रेक लावला. गाडी तर थांबली पण अचानक लागलेल्या ब्रेकमुळे इतर चालकांमध्ये भीतीचा धडका ऊडाला आणि आणखी चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सगळ्या गाड्यांचे मोठ नुकसान झाले असले तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा