Advertisement

Mission Begin Again 2.0 : १ जुलैपासून काय सुरू, काय बंद?

राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी करत येत्या १ जुलैपासून राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या सेवांमध्ये शिथिलता देण्यात येईल, हे देखील स्पष्ट केलं आहे.

Mission Begin Again 2.0 : १ जुलैपासून काय सुरू, काय बंद?
SHARES

महाराष्ट्र सरकारने ३० जुलैपर्यंत लाॅकडाऊन (Lockdown 6.0) सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नवीन परिपत्रक जारी करत येत्या १ जुलैपासून राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या सेवांमध्ये शिथिलता देण्यात येईल, हे देखील स्पष्ट केलं आहे. 

या परिपत्रकानुसार मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह (Activities allowed in maharashtra during the lockdown 6.0 period) मंजुरी देण्यात आली आहे. तसंच काही सेवांवर निर्बंधही लावण्यात आले आहेत.

मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्प्यातील अटी-शर्ती कायम :

  • राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थानं ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
  • मेट्रो आणि रेल्वे सेवा राहणार बंद.
  • चित्रपटगृहं, जिम, स्विमिंग पूल, पार्क, बार, असेंबली हॉल आणि अशाप्रकारच्या जागांवर बंदी कायम.
  • सामाजिक / राजकीय / खेळ / धार्मिक कार्य / मनोरंजन / सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम.
  • अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहतील
  • इतर दुकानेही संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार सुरू राहतील (ऑन-इव्हन नियमावली कायम) 
  • शाॅपिंग मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता इतर सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडतील.
  • मद्य दुकाने सुरु करण्यास परवानगी असल्यास उघडतील. अन्यथा होम डिलिव्हरीसाठी परवानगी
  • आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करता येईल
  • सर्व प्रकारची औद्योगिक कामे इथून पुढंही सुरु राहतील
  • खाजगी/ सार्वजनिक बांधकाम साईट किंवा मान्सूनपूर्व कामे करण्यास परवानगी
  • रेस्टॉरंट/किचन होम डिलिव्हरीला परवानगी
  • ऑनलाईन/दूरशिक्षण संबंधित कामांना परवानगी
  • सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) १५ टक्के किंवा १५ कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
  • सर्व खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील

हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

टॅक्सी, कॅब- ड्रायव्हर+ २ प्रवासी

रिक्षा- ड्रायव्हर+ २ प्रवासी

चारचाकी- ड्रायव्हर+ २ प्रवासी

दुचाकी- चालक (अत्यावश्यक गरजेसाठीच)

  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांना कामे करण्यास परवानगी 
  • वेळ घेऊन  गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीच्या कामांना परवानगी 
  • मुंबई महानगर क्षेत्रात अत्यावश्यक सेवा तसंच कार्यालयीन कामांना जाण्यास परवानगी परंतु अत्यावश्यक सेवा वगळता इतर खरेदीसाठी नजीकच्या बाजारपेठांव्यतीरिक्त इतर ठिकाणी जाण्यास मनाई
  • लग्नसंबंधी कार्यक्रम मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉलमध्ये घेण्यास परवानगी
  • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायामाला अटी-शर्थीनुसार परवानगी
  • वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी
  • शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणी किंवा निकाल जाहीर करण्याच्या कामासाठी प्रवास करु शकतील
  • केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्यास परवानगी
  • जिल्हांतर्गत बस सेवेला ५० टक्के प्रवाशांसह परवानगी

हेही वाचा - ठाण्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा