Advertisement

पालिका प्रयोगशाळेत अत्याधुनिक पद्धतीची अन्नचाचणी यंत्रणा

मुंबई महापालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत अत्याधुनिक पद्धतीची अन्नचाचणी यंत्रणा उभारली जाणार आहे.

पालिका प्रयोगशाळेत अत्याधुनिक पद्धतीची अन्नचाचणी यंत्रणा
SHARES

मुंबई महापालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत अत्याधुनिक पद्धतीची अन्नचाचणी यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे पाणी व खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची चाचणी कमी वेळात व अचूक होणार आहे. या यंत्रणेसाठी १ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दादर येथील जी-उत्तर विभाग कार्यालयात पालिकेच्या मालकीची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत नागरिकांकडून आलेले पाणी व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जातात.

 हॉटेल्समधील खाद्यपदार्थ व खासगी वसाहतीतील पाण्याचे नमुनेही शुल्क आकारून येथे तपासले जाते. नागरिकांना पाणी व खाद्यपदार्थांतील घटकांची चाचणी करून घेण्यासाठी पालिकेची मुंबईतील ही एकमेव प्रयोगशाळा आहे. दरवर्षी या प्रयोगशाळेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध विभागीय जलाशयांमधून आलेले ७० हजार पाण्याचे नमुने व शाळांना पुरविण्यात येणाऱ्या खिचडीच्या सहा हजार नमुन्यांची चाचणी केली जाते.

या चाचण्या सध्या वेगवेगळ्या उपकरणांमार्फत केल्या जातात. त्यात खूप वेळ जातो. मनुष्यबळही जादा लागते. त्यावर पर्याय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अन्नचाचणी विश्लेषक यंत्राची मागणी प्रयोगशाळेकडून करण्यात आली होती. हे यंत्र कमी वेळात जास्त नमुने हाताळू शकते व नमुन्यांचे विश्लेषण अचूक करते. त्यामुळे प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन पैशांचीही बचत होणार आहे. चाचणी यंत्राचा पुरवठा, त्यासाठीचे युनिट व प्रत्यक्ष चाचणीचे काम यासाठी इलेक्ट्रोकुल इंजिनीअरिंग या कंपनीला काम देण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत ही यंत्रणा उभारण्याची अट कंपनीला घालण्यात आली आहे.हेही वाचा -

महापालिका अनधिकृत फेरीवाल्यांना आकारणार 'इतका' दंड

मुंबईला पुरवत होते भेसळयुक्त दुध

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा