Advertisement

कशी झाली आयसी कॉलनी चकाचक?


कशी झाली आयसी कॉलनी चकाचक?
SHARES

आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आजही अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरलेली आहे. तर काही भागात सोयी-सुविधांचा अभाव आहे. पण बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी हा विभाग स्वच्छता आणि सोयी-सुविधांनी परिपूर्ण आहे. 

खरेतर या विभागातही स्वच्छता आणि सोयी-सुविधांचा आभाव होता. या विभागात पाणीपुरवठा देखील व्यवस्थित होत नव्हता, पण स्थानिकांनी पुढाकार घेत या भागाचे संपूर्ण चित्रच पालटले. त्यामुळेच आज स्वच्छ आणि सुंदर विभाग म्हणून आयसी कॉलनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


कसे पालटले चित्र?

या परिसराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यामागे 55 वर्षाच्या युआन डिसुझा यांचा खारीचा वाटा आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या गेल्या 35 वर्षांपासून कार्यरत आहेत. आपला परिसर आणखी स्वच्छ आणि सुदंर व्हावा, यासाठी 2005 साली त्यांनी महापालिकेशी भागीदारी करत अॅडव्हान्स लोकॅलिटी मेनेजमेंट (एएलएम) ही संकल्पना राबवली. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याची विल्हेवाट ही समस्या सोडवण्यासाठी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करुन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली. 


'कीप हाऊस क्लीन, नेव्हर गेट्स क्लीन, बट कीप युअर सराऊंड क्लीन, देन युअर हाऊस गेट्स क्लीन. आज महिला वर्गाची साथ आणि त्यात सुविचारांची बात, यामुळेच हा विभाग पूर्ण पणे बदलला आहे.


- युआन डिसुझा


आज हा परिसर सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. आज युआन या 400 महिलांचं स्वच्छता, विकास आणि महिला सशक्तीकरण यांसारख्या याविषयांवर प्रबोधन करतात. आय. सी. कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून त्या 2006 पासून कार्यरत आहेत.


मुलगी शिकली तर प्रगती होते. त्यासाठी मुंबई शहरातून जास्तीत जास्त महिला पुढे आल्या, तर एएलएमच्या माध्यमातून संपूर्ण शहर स्वछ आणि सुंदर होईल.


सुभाष पाटील, अधिकारी, एएलएम




हेही वाचा -

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे वरळी हिलचे बाबुजी!

बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा