वर्षानुवर्षे खराब रस्त्याचा वापर केल्यानंतर अखेर ठाणे आणि पालघर (palghar) जिल्ह्यांच्या सीमेवरील सावर्डे गावाला कायमस्वरूपी पुलासाठी (bridge) मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे वाहतुकीच्या मूलभूत सुविधांसाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य वैतरणा धरणातून अचानक आणि अघोषित पाणी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 30 वर्षीय कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या भास्कर पादीर यांच्या दुःखद मृत्यूच्या (death) एका वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थान टाईम्सने सप्टेंबर 2024 मध्ये दर पावसाळ्यात ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणींवर सखोल लेख लिहिला होता.
6 जून रोजी, सावर्डेचे सरपंच हनुमंत पादीर यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पत्र मिळाले, ज्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सावर्डे-दापोरा-सावरखुट येथे मध्य वैतरणा धरणाजवळ एक मोठा पूल बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. या पत्राची हिंदुस्थान टाईम्सकडे प्रत देखील आहे.
भास्कर यांच्या मृत्यूमुळे ठाणे जिल्ह्यातील (thane) सावर्डे आणि शेजारच्या दापोरा गावात संतापाची लाट उसळली होती. दोन्ही गावे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या 84 मीटर उंचीच्या मध्य वैतरणा धरणापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहेत.
2012 मध्ये बांधलेले हे धरण मुंबईच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 455 दशलक्ष लिटर पाणी साठवते. तथापि, या धरणाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे धरण धोक्याची घंटा आहे.
"वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर, आमच्या गावाला अखेर बहुप्रतिक्षित पुलाची अधिकृत मान्यता मिळाली आहे," असे गावकरी हनुमंत म्हणाले. "हे अथक समुदायाच्या प्रयत्नांचे आणि आमच्या प्रतिनिधींच्या भक्कम पाठिंब्याचे परिणाम आहे.
खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी जानेवारी 2024 मध्ये हा मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यांच्याकडून मंजुरी मिळाली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रशासनाला कारवाई करण्यास प्रवृत्त केले गेले.
सावर्डे गावात फक्त दोन शेअर्ड टॅक्सी आहेत ज्या प्रत्येक ट्रिपसाठी 200 रुपये आकारतात आणि प्रवाशांना शहापूर बस स्टॉपपर्यंत नेतात. तेथून गावकरी उंबरमाळी स्टेशनला बसने ( 20 रुपये) आणि नंतर रेल्वेने कल्याणला ( 25 रुपये) जातात.
प्रवासाचा एकूण खर्च अनेकदा आठवड्याला 500 रुपयांपेक्षा जास्त असतो. अनेक गावकऱ्यांसाठी हा जवळजवळ पूर्ण दिवसाचा पगार आहे, ज्यांपैकी बहुतेक जण रोजंदारीवर किंवा वीटभट्टीवर काम करणारे कामगार आहेत जे दररोज सुमारे 500 रुपये कमवतात.
प्रवास खर्च कमी करण्यासाठी, गावकऱ्यांनी, ज्यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचाही समावेश होता. त्यांनी धोकादायक नदीवरील लाकडी फळीवरून प्रवास करून शॉर्टकटचा वापर केला. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर चार वर्षांपूर्वी लाकडी फळीऐवजी एका तात्पुरत्या लोखंडी पुलाचा वापर केला.
हा तात्पुरता लोखंडी पुल वैतरणा नदीवर आहे, ज्यामुळे दापोराला जाण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या 20 किमीच्या प्रवासापेक्षा पाच किमीचा स्वस्त आणि जलद मार्ग मिळतो. परंतु कालांतराने ती खराब झाली आहे. तसेच वापरण्यास अत्यंत असुरक्षित आहे. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात येते तेव्हा नदीचे पाणी वाढून येथील पूल वापरण्यास कठीण होऊन बसते.
गेल्या वर्षी भास्कर यांच्या मृत्यूपूर्वी नदीत बुडालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला होता आणि अखेर गावांनी निषेधार्थ एकत्र येऊन निषेध नोंदवला. जबाबदारी आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांची मागणी करत, रहिवाशांनी मोर्चे काढले, याचिका पाठवल्या आणि राजकीय नेत्यांकडून मदत मागितली होती.
अखेर गावकऱ्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आणि गावकऱ्यांना मजबूत असा कायमस्वरूपी पूल मिळण्याबाबत मंजुरी मिळाली आहे.
हेही वाचा