Advertisement

पर्यटकांनो, ठाणे-पालघर जिल्ह्यातील धबधब्यांवर आता नो एण्ट्री!

पावसाळ्यात मौजमजेसाठी धबधब्यांकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र त्याचवेळी धबधब्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होते. परिणामी पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील धबधब्यांवर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.

पर्यटकांनो, ठाणे-पालघर जिल्ह्यातील धबधब्यांवर आता नो एण्ट्री!
SHARES

मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे पर्यटकांची पावलं धबधब्यांकडे वळत आहेत. मात्र, दुथडी भरून कोसळणाऱ्या धबधाब्यामुळे पर्यटकांसोबत अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणं आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील धबधब्यांवर देखील पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पावसाळ्यात मौजमजेसाठी धबधब्यांकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र त्याचवेळी धबधब्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होते. परिणामी पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील धबधब्यांवर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.

काही दिवसांपूर्वी खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास देखील स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली होती.

३५ पर्यटकांची सुटका

काही दिवसांपूर्वी वसईतील चिंचोटी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले ४० पर्यटकांपैकी ३५ पर्यटक धबधब्याचं पाणी अचानक वाढल्यानं अडकले होते. त्यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सहाय्यानं या पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात आलं होतं.

बंधी कधीपर्यंत?

अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी पालघर जिल्ह्यातील धबधब्यांवर देखील पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील २ महिने म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत ही बंदी असणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांना धबधब्यांची मजा घेता येणार नसल्याने त्यांचा हिरमोड होऊ शकतो.

हेही वाचा-

याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?

यंदा 'या' धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेश बंदी

मिशन 'पळसदरी' धबधबा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा