Advertisement

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना नानावटीतून डिस्चार्ज, मात्र बिग बी...

ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना नानावटीतून डिस्चार्ज, मात्र बिग बी...
SHARES

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या अमिताभ आणि अभिषेक हे दोघेही नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

१७ जुलै रोजी ताप असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल दहा दिवस त्यांच्यावर नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू होते.

ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचं अभिषेकनं ट्विट करून सांगितलं आहे. अभिषेकनं ट्विट केलं की, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे. सुदैवानं ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्या आता घरी आहेत. सध्या मी आणि माझे वडील रुग्णालयातच असल्याचंही त्यानं आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : व्हॅक्सीन बनवण्याची जबाबदारी सोनू सूदला द्या, चाहत्याला सोनूचं मजेशीर उत्तर

११ जुलै रोजी अमिताभ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण त्यांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आलं होतं. पाच दिवसांनी म्हणजे १७ जुलै रोजी त्यांना ताप आल्यानं तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण आता त्या घरी पोहोचल्या आहेत.

बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या जलसा बंगल्याला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 26 जुलै मुंबई महापालिकेनं जलसावरील कंटेन्मेंट झोनचा बोर्ड काढला आहे.



हेही वाचा

जलसावरील कंटेन्मेंट झोन पोस्टर हटवलं

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा