Advertisement

मुंबईतून खड्डे गायब, ८७९ रस्त्यांची कामं पूर्ण


मुंबईतून खड्डे गायब, ८७९ रस्त्यांची कामं पूर्ण
SHARES

मुंबईतील खराब रस्ते आणि रस्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे यामुळे तीन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे. 'प्राधान्यक्रम १' अंतर्गत १०७, 'प्राधान्यक्रम २' अंतर्गत ३४७ आणि 'प्राधान्यक्रम ३' अंतर्गत ६१ कामे आणि याशिवाय ३६४ प्रकल्प रस्ते अशाप्रकारे एकूण ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना खड्ड्यांतून दचके खात नाही तर तुळतुळीत रस्त्यांवरून आरामदायी प्रवास करता येणार आहे.


रस्त्यांच्या कामाचं योग्य नियोजन

मुंबईत १ हजार १०६ रस्त्यांच्या कामांचं नियोजन करण्यात आलं असून त्यानुसार अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. यामध्ये ७३ जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामं प्रगतीपथावर असून त्यामध्ये ४६ जंक्शनच्या कामांचाही समावेश आहे. ही कामे मे महिन्याअखेर पूर्ण होणंं अपेक्षित असल्याची माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.


पावसाळ्यानंतर उर्वरित कामं

उर्वरित ५८४ कामं ही पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत. पावसाळ्यानंतर हाती घेतल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये २७ जंक्शनच्या कामांचाही समावेश आहे. तसेच एप्रिल २०१८ अखेरपर्यंत रस्त्यांची ८७९ कामे नियोजनबद्धरित्या पूर्ण झाली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.


यावर्षी होणारे प्रकल्प रस्ते

यावर्षी होणाऱ्या प्रकल्प रस्त्यांच्या (Project Roads) ६४८ कामांमध्ये ३६ जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. यापैकी ३११ कामे ही मे अखेरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. यामध्ये २९ जंक्शनच्या कामांचाही समावेश आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची ३३७ कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यात ७ जंक्शनच्या कामांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.


स्टॅक समितीच्या शिफारशीनुसार कामं

'प्रकल्परस्ते' हे स्टॅक समितीने शिफारस केल्याप्रमाणे हाती घेण्यात येतात. स्टॅक समितीच्या शिफारशीनुसार रस्त्याचा पाया, खडीकरण, पृष्ठीकरण इत्यादी सर्व कामांचा यात समावेश होतो. तर प्राधान्यकामेही मुंबईतील सर्व रस्त्यांची पाहणी करून त्यातील अतिखराब, खराब आणि त्याखालोखाल खराब अशाप्रकारे वर्गवारी करून त्याप्रमाणे प्राधान्यक्रम बनवून या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती.


हेही वाचा -

हे काय भलतंच? पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक!

पावसाळ्यात मलेरियासाठी 'हे' भाग पालिकेच्या रडारवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा