Advertisement

हे काय भलतंच? पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक!

डिपार्टमेंटच्या जाचक अटींना कंटाळून एका पोलिस शिपायानं चक्क भीक मागायची परवानगी मागितली आहे! आणि तीही थेट गणवेशामध्ये! त्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून या पोलिस शिपायाबाबत नक्की असं झालं तरी काय? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

हे काय भलतंच? पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक!
SHARES

डिपार्टमेंटच्या जाचक अटींना कंटाळून एका पोलिस शिपायानं चक्क भीक मागायची परवानगी मागितली आहे! आणि तीही थेट गणवेशामध्ये! त्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून या पोलिस शिपायाबाबत नक्की असं झालं तरी काय? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.


थेट मुख्यमंत्री, राज्यपालांना धाडलं पत्र!

मरोळच्या राखीव पोलिस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर अहिरराव यांच्याबाबत हा सगळा प्रकार घडला आहे. निव्वळ सुट्टीमध्ये वाढ झाल्याकारणाने त्यांचा पगार थांबवण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला. त्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गणवेशामध्ये भीक मागण्याची परवानगी मागितली आहे. तसं पत्रच त्यांनी पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलं आहे.



पत्नीच्या दुखापतीसाठी वाढवली रजा

ज्ञानेश्वर अहिरराव हे मातोश्री बंगल्यावर ड्युटीसाठी आहेत. मार्च महिन्याच्या २० ते २२ तारखेपर्यंत म्हणजेच ३ दिवस ते रजा घेऊन कार्यक्रमासाठी गावी गेले होते. मात्र, यादरम्यान त्यांच्या पत्नीच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्या पायाला प्लास्टरही करावे लागले. त्यामुळे 'पत्नीच्या पायावर औषधोपचार करण्यासाठी आपण इथे थांबणं आवश्यक असल्यामुळे मी काही दिवस कामावर येऊ शकणार नाही', असं त्यांनी ठाणे अंमलदार यांना फोनवर कळवलं.


रजा वाढली, पगार थांबला

२८ मार्चला जेव्हा घरची परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यानंतर जेव्हा ज्ञानेश्वर अहिरराव पुन्हा कामावर रुजू झाले, तेव्हा रजा वाढवल्याचं कारण देत त्यांचा पगार थांबवल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासमोर पेचप्रसंग उभा राहिला.


'घरचा खर्च भागवू कसा?'

आहिरराव यांच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या घरात ते एकटेच कमावणारे आहेत. घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे 'मासिक वेतन जर मिळणार नसेल, तर घरखर्च, पत्नी व वयोवृद्ध आईवडिलांचा खर्च कसा भागवू?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे खाकी वर्दीवर भीक मागण्याची परवानगी मिळावी अशी परवानगी मागणारे पत्र आहिरराव यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवले आहे.


अहिररावांचं गाऱ्हाणं कुणी ऐकणार का?

अहिरराव यांच्या या पत्रामुळे मुंबई पोलिस दलात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांपर्यंत त्यांनी गाऱ्हाणं मांडलं असताना त्यांना काय प्रतिसाद मिळतो, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.



हेही वाचा

पोलिस भरतीसाठी आलेल्या चौघींचा गंभीर अपघात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा