Advertisement

..आणि भिंती बोलू लागल्या!


..आणि भिंती बोलू लागल्या!
SHARES

महात्मा गांधी यांचा जयंती सप्ताह 'दान उत्सव' म्हणून दरवर्षी पाळण्यात येतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही 8 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव शहर आणि उपनगरात साजरा केला जात आहे.

या उपक्रमांतर्गत 'आय व्हॉल्युंटीअर' ही संस्था मुंबई शहरातील भिंती सुशोभित करण्याचे काम करत आहे. या दान उत्सवात 1 हजाराहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये मुंबईमधील अनेक लोकांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. दादर, चर्चगेट, अंधेरी, घाटकोपर या ठिकाणी भिंती सुशोभित केल्या जात आहेत. यावेळी ओपन स्कूल, स्वच्छ भारत, ट्रॅफिक रूल्स, खेळाचे महत्त्व असे महत्त्वाचे विषय हाताळले जात आहेत.



मुंबईतील भिंती रंगवून दिला सामाजिक संदेश

'आय व्हॉल्युंटीअर' ही संस्था आपल्या स्वयंसेवकांसह शहरात काम करत आहे. ही संस्था गेली 17 वर्षे कार्यरत असून 7 शहरांमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत. शहरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना स्वयंसेवक पुरवण्याचे काम ही संस्था करते. यंदा दान उत्सवानिमित्त मुंबईतील भिंती रंगवून सामजिक संदेश देण्याचे काम ही संस्था करत आहे. सध्या दादरमध्ये महापालिका जी उत्तर विभाग आणि दादर इंदू मिल या ठिकाणी हे स्वयंसेवक सध्या रंगरंगोटीचे काम करत आहेत.



'मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शहर सुंदर करावे, तुम्ही तुमच्या वेळेतला थोडा वेळ काढून सहभागी व्हावे,' असे आवाहन या संस्थेच्या स्वयंसेविका श्रुती लिमये यांनी केले आहे.



हेही वाचा - 

मुंबईतल्या 'बोलक्या' भिंती !


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा