Advertisement

मुंबईतल्या 'बोलक्या' भिंती !


मुंबईतल्या 'बोलक्या' भिंती !
SHARES

भिंतीवरील मनमोहक चित्रांनी सध्या मुंबईचे रुप बदलून गेले आहे. रस्त्यांवरच्या भिंतीं, रेल्वे स्टेश्न्स, फ्लायओव्हर, गार्डन्स, इमारतींच्या भिंतींवर सध्या मुंबईतील वास्तववादी जगणे रेखाटलेले पाहायला मिळते. मानवी हावभाव अर्थात इमोजीस, पक्षी, झाडे अशी मॉर्डन चित्रकारी हल्ली मुंबईत आकर्षणाचे केद्रबिंदू ठरत आहे. एवढेच काय? चित्रांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेशही दिले जातात



अनेकदा पान खाऊन भिंतींवर पिचकाऱ्या मारणारे मुंबईकर तुम्ही पाहिलेच असतील. पानाच्या पिचकाऱ्या मारून मुंबईच्या भिंतींचे विद्रुपिकरण झालेले आपण पाहिले आहे. पण असे काही कलाकार आहेत जे मुंबईला सुंदर बनवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. शहराच्या भिंती सुंदर दिसाव्यात, इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांना शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख पटावी याच उद्देशाने ते भिंतींवर वेगवेगळी चित्रे रेखाटली जतात. 


अंधेरीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूलाचा रस्ता वायकॉमच्या चकाचक मुबई प्रकल्पाचा एक भाग आहे. या भिंतींवर प्रियंका चोप्राने साकारलेली मेरी कॉमची व्यक्तीरेखा आणि धावपटू मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारणारा फरहान अख्तर या दोघांचे चित्र पाहायला मिळते. वाहनांच्या गर्दीत सुद्धा ही चित्रे उठून दिसतात



शिवडीमधल्या पोलीस कॉलनीतील कलकारांनी सुद्दा भिंतींवर सामाजिक संदेश दिले आहेत. स्त्री शिक्षण जननी अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे चित्र खूप बोलके वाटते. बाल मजूरीला विरोध करणारे चित्र देखील या भिंतीवर रेखाटलेले आहे. एवढेच नाही तर मुंबईची रक्षा करणाऱ्या पोलीस दलाला सुद्धा या कलाकारांनी चित्राद्वारे सलामी दिली आहे.




कर्नाक बंदर इथल्या खाजगी वाहनांच्या पार्किंग डेपोच्या भिंतींवर अज्ञात कलाकरांनी शहराच्या किनारपट्टीचे दर्शन चित्राद्वारे अधोरेखीत केले आहे



वडाळ्यातल्या नॅशनल एड्स कंट्रोल ऑफिसच्या भिंतींवर साकारण्यात आलेले हे चित्र खूप बोलके आहे. लहान मुलांच्या मनातील घालमेल आणि पालंकांचा दृष्टीकोन यावर हे चित्र आधारीत आहे



गोवंडी स्टेशनच्या भिंतींवर काढण्यात आलेले चित्र मनाला समाधान तर देतेच. याशिवाय एक आनंदी वातावरण निर्माण करते.  




वांद्रेतल्या पाली नाका इथे ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचे आकर्षक चित्र पाहायला मिळते. नक्कीच एवढे सुंदर चित्र त्यांचा चाहताच काढू शकतो.  



मुंबईला दर्शवणारे हे चित्र खरच खूप बोलके आहे. शिवाजी पार्क इथल्या भिंतीवर काढलेल्या या चित्रात मुंबईतील दळणवळ सेवा अधोरेखीत करण्यात आली आहे.



फोटो - गेणेश रहाटे


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा