Advertisement

बाजारात आल्या प्लास्टिकला पर्यायी वस्तू


बाजारात आल्या प्लास्टिकला पर्यायी वस्तू
SHARES

मुंबईसह राज्यभरात शनिवार २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. त्यामुळे प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनलेल्या प्लेट्स, ग्लासेस, चमचे आणि वाट्या अादी वस्तू आढळल्यास नागरिकांसह विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र, प्लास्टिक बंदीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी लालबागच्या बाजारात प्लास्टिकला पर्यायी वस्तू विक्रीसाठी अाल्या अाहेत.

प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंना पर्यायी वस्तू म्हणून बाजारात सुपारी, उस, मका यापासून बनवलेल्या प्लेट्स, ग्लासेस, चमचे त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी म्हणून बाजारात कापडी पिशव्या उपलब्ध आहेत.  नागरिकांना प्लास्टिक बंदीनंतर या वस्तू वापरता येणार आहेत. मात्र, ग्राहकांना आता यापैकी प्रत्येक वस्तू मागे सुमारे ७ ते ८ रुपये मोजावे लागणार आहेत.


सुपारी ताट  - १० नगाच्या सुपारी ताटाच्या एक पॅकेटची किंमत बाजारात १०० ते १३० रुपये आहे.


मका ताट   - २५ नगाचे मक्याच्या ताटाचे पॅकेट २२० रुपयांना मिळत आहे.


उसाच्या चिपाडाचे ताट - २५ नगाच्या सुपारी ताटाच्या एक पॅकेटची किंमत २०० रुपये आहे.


पेपर ग्लास -  प्लास्टिक आणि थर्माकोलच्या ग्लासेसला पर्यायी म्हणून बाजारात पेपर ग्लास उपलब्ध आहेत. या ५० नगाच्या ग्लासेसच्या एक पॅकेटची किंमत १०० रुपये आहे.



हेही वाचा -

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसूफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा

आषाढी एकादशीनिमित्त ३७८१ जादा एसी बस


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा