अमरनाथ यात्रेतल्या जखमी महिलेवर जे. जे. मध्ये शस्त्रक्रिया

Mumbai
अमरनाथ यात्रेतल्या जखमी महिलेवर जे. जे. मध्ये शस्त्रक्रिया
अमरनाथ यात्रेतल्या जखमी महिलेवर जे. जे. मध्ये शस्त्रक्रिया
See all
मुंबई  -  

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर 10 जुलैच्या रात्री हल्ला झाला. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. मृत पावलेल्यांमध्ये पालघरमधल्या दोन महिलांचाही समावेश असून डहाणूच्या रहिवासी छाया मेहर यादेखील जखमी झाल्या. त्यांच्यावर मुंबईतील सर. जे. जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ल्यात छाया मेहर यांच्या हाताला एक गोळी लागली होती. ती गोळी त्या हातात अडकून राहिली होती. खांद्यात अडकलेली गोळी गुरुवारी जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढली आहे.

दहशतवादी हल्ल्यात छाया मेहर यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. एक गोळी पोटात आणि दुसरी गोळी हातात लागली होती. त्यानंतर प्राथमिक उपचार करुन मेहर यांना जम्मू-काश्मीरवरून मुंबईत हलवण्यात आले. त्यानंतर बुधवारी लगेचच मेहर यांना सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. जे. जेच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांनी मेहेर यांच्यावर शस्त्रक्रिया केली.


बुधवारी दुपारी त्यांच्या उजव्या हातात अडकलेली गोळी आम्ही काढली. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यावर आम्ही उपचार केले. त्याचे एक हाड मोडले आहे. त्यावरही उपचार केले आहेत. येत्या दोन-तीन आठवड्यात त्यांची जखम भरून निघेल. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.

- डॉ. एकनाथ पवार, ऑर्थोपेडीक विभाग प्रमुख, सर जे. जे. रुग्णालय


त्यांच्या उजव्या हाताला लागलेली गोळी शस्त्रक्रिया करुन काढण्यात आली आहे. जे हाड मोडले होते, त्यावर उपचार करण्यात आले आहे. मेहेर यांच्या पोटात छोटी जखम आहे. गोळी लागल्यामुळे ही जखम झाली आहे. पण, डॉक्टर्स त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.

-डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, सर. जे. जे. रुग्णालय


हेही वाचा - 

काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना डबेवाल्यांनी वाहिली श्रद्धांजली


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.