Advertisement

काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना डबेवाल्यांनी वाहिली श्रद्धांजली


काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना डबेवाल्यांनी वाहिली श्रद्धांजली
SHARES

मुंबईचे डबेवाले जसे दररोज वेळेवर लोकांपर्यंत डबे पोहचवतात, त्याच प्रमाणे ते समाजात घडणाऱ्या घटनांची दखल घेत जनजागृती देखील करतात. मग ते 'आरे बचाव मोहीम' असो वा नैसर्गिक रंगांची होळी किंवा इतर कोणत्याही घटना. या सर्वांची दखल घेऊन डबेवाले नेहमीच जनजागृती करत असतात.

भारतातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरुंच्या बसवर काश्मीरच्या अंतनागमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 यात्रेकरुंचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा मुंबईच्या डबेवाल्यांनी बुधवारी लोअर परेल येथे जाहीर निषेध नोंदवला.

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय दुखावला गेला आहे. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी आक्रोश व्यक्त करत अशा भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत अशा भ्याड हल्ल्यांपुढे कधीच झुकणार नाही. चीनने तिकडे मानसरोवर-कैलास पर्वत यात्रा थांबवली आहे. तर, इकडे अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ले होत आहेत. असे म्हणत डबेवाल्यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत डबेवाला संघटनेचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.


10 जुलै रोजी अमरनाथच्या यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र पडसाद उमटले. मुंबईच्या डबेवाल्यांप्रमाणेच देशभरातून हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. ट्विटरवरही अनेकांनी हल्ल्याचा निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरवर हल्ल्याचा निषेध केला.


यासोबतच काश्मीरमध्येच सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रियाही काही नेटिझन्सकडून व्यक्त होऊ लागली आहे.






हेही वाचा - 

आदिवासी जनतेला कपडे आणि धान्याची मदत

डबेवाल्यांची 'विठ्ठल मंदिर स्टेशन'ची मागणी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा