डब्बेवाल्यांनी केला इकोफ्रेंडली होळीचा जागर

मुंबई - होळी हा सण उत्साहाचा, आनंदाचा आणि रंगाचा. पण, हा सण खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. याच पार्श्वभूमीवर होळी इको फ्रेंडली आणि पर्यावरण पूरक खेळावी म्हणून मुंबईच्या डब्बेवाल्यांनी पुढाकार घेतलाय. इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक होळी, तसंच सेव्ह वॉटर प्ले ड्राय असा संदेश डबेवाल्यांकडून देण्यात आला. 

डब्बेवाल्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात बिसलेरी कंपनीनेही सहभाग घेतलाय. एकूण 5000 नैसर्गिक रंग बिसलेरीच्या बॉटल्समध्ये भरुन त्या बॉटल्स शुक्रवारी डब्बेवाल्यांना देण्यात आल्या. 

डबेवाले नेहमीच डब्बे मुंबईकरांपर्यंत पोहोचवत असतात. आता ते डब्यांसोबत सामाजिक संदेशही पोहोचवणार आहेत.

Loading Comments